महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात आमदारांच्या जनता दरबाराला पालकमंत्र्यांची 'भेट', नागरिकांची गाऱ्हाणी सोडवली

आमदार पंकज भोयर यांच्या जनता दरबाराला भेट देऊन पालकमंत्र्यांनी लोकांची गाऱ्हाणी सोडवली.

By

Published : Jun 24, 2019, 8:05 AM IST

Updated : Jun 24, 2019, 9:29 AM IST

वर्ध्यात आमदारांच्या जनता दरबारातील गाऱ्हाणी पालकमंत्र्यांनी सोडवली

वर्धा- राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री हे वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी भाजपचे आमदार पंकज भोयर यांच्या जनता दरबारात पालकमंत्री पोहोचले. यावेळी सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबारात अनेकांच्या अर्जांवर संबंधित विभागाला सुचना देत प्रश्न मार्गी लावले. यावेळी नागरिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लवात गाऱ्हाणी चक्क राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडली.


पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीला आंजी येथील वृक्ष दिंडीला हिरवी झेंडी दाखवत आंजी येथील ऑक्सिजन पार्कला वृक्ष लागवड केली. त्यानंतर वर्धा विधानसभेचे आमदार पंकज भोयर यांच्या घरी दिव्यांग बांधवांकडून सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या मिळणाऱ्या अनुदानात वाढ केल्याने दिव्यांग बांधवांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत करून सत्कार करत आभार मानले.

वर्ध्यात आमदारांच्या जनता दरबारातील गाऱ्हाणी पालकमंत्र्यांनी सोडवली

यानंतर आमदार पंकज भोयर यांच्या जनता दरबाराला भेट दिली. यावेळी नागरिकांनी गाऱ्हाणी मांडायला प्रचंड गर्दी केली होती. यात अनेक निवेदन देऊनही न सुटणाऱ्या प्रश्नांवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर भेट देत प्रश्न निकाली काढण्याची ही पहिलीच वेळ जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना मिळाली. यामुळे नागरिकही मोठ्या आशेने जनता दरबारात सहभागी झाले होते.

यावेळी महिलांनीही आपल्या समस्यांचा पाढा वाचला. यावर संबशीत विभागाने काय कारवाई केली, याचे सुद्धा कळवण्याचे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी स्वरुपात निवेदनावर दिले. त्यामुळे प्रशासन या सहीचा मान राखत प्रश्न सोडवतात का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लगले आहे.

Last Updated : Jun 24, 2019, 9:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details