महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्ट्राँग रुमसाठी जागेची पाहणी; भारतीय खाद्य निगमच्या गोदामात नियोजन - election period

स्ट्राँग रूम सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या जवानांचा बंदोबस्त असणार आहे. त्यांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची तसेच स्नानगृह आणि मूलभूत सुविधा इथे उपलब्ध करून द्याव्या. संबंधित विभागाने एकमेकाशी ताळमेळ जुळवत स्ट्राँ रूम व्यवस्थेचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमांवर यांनी पाहणीदरम्यान दिले.

भारतीय खाद्य निगमच्या गोदामाचा वापर करणार

By

Published : Mar 17, 2019, 11:53 AM IST

वर्धा- लोकसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ठेवण्यासाठी भारतीय खाद्य निगमच्या गोदामाचा उपयोग केला जातो. सद्यस्थितीत गोदामात मोठ्या प्रमाणात धान्यसाठा साठवून ठेवलेला आहे. त्यामुळे स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यासाठी भारतीय खाद्य निगमचे गोदाम तत्काळ खाली करण्याचे निर्देश दुपारी पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.

भारतीय खाद्य निगमच्या गोदामाचा वापर करणार

लोकसभा निवडणुकीत मतदानानंतर प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे स्ट्राँग रूमचे नियोजन. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदान केंद्रांची संख्या, उमेदवारांची संख्या तसेच सोबतीला ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट सगळ्याचे नियोजन पाहता जागासुद्धा वाढून लागणार आहे. त्यानंतर मतदान ते मतमोजणीपर्यंत मधातल्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आज देण्यात आले.

गोदामाचे स्ट्राँग रूममध्ये रूपांतर करणे -
यामध्ये गोदामाला स्ट्राँग रूममध्ये रूपांतर करण्यासाठी सर्व खिडक्या झरोके बंद करण्यात यावे. तसेच पोलिसांना स्ट्राँग रूम सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवाव्या. बांधकाम विभागाने त्यादृष्टीने पावले उचलत योग्य नियोजन करावे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कठडे उभारावे. परिसरात येणाऱ्या रेल्वेमार्गाचे गेट बंद करावे, आदी नियोजन पाहणी दरम्यान करण्यात आले आहे.

स्ट्राँग रूम सुरक्षेसाठी बंदोबस्त -
स्ट्राँग रूम सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या जवानांचा बंदोबस्त असणार आहे. त्यांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची तसेच स्नानगृह आणि मूलभूत सुविधा इथे उपलब्ध करून द्याव्या. संबंधित विभागाने एकमेकाशी ताळमेळ जुळवत स्ट्राँ रूम व्यवस्थेचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमांवर यांनी पाहणीदरम्यान दिले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड आणि भारतीय खाद्य निगमचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details