राज्यपालांनी दिली सेवाग्रामला भेट, त्यांनाही आवरला नाही खादीचा मोह
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सर्वप्रथम सेवाग्राम आश्रमास भेट दिली. त्यानंतर त्यांनी आश्रमात जेवण करुन खादीचे कापड घेतले.
वर्धा - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. रविवारी (दि. 26 जुलै) ते वर्ध्यातील महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमास भेट दिली. यावेळी ते दीड तास राहिले. आश्रमातील जेवणाचा आग्रह असल्याने त्यांनी आश्रमातील सात्विक जेवण केले. शिवाय येथे त्यांनी 9 मीटर खादीचे कापड घेतले.
मागील अनेक दिवसांपासून त्यांना सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. यापूर्वी त्यांचे येणे शक्य झाले नाही. आज त्यांचा अचानक दौरा ठरवण्यात आला. आज त्यांनी पहिल्यांदाच सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी सेवाग्राम आश्रमातील पुस्तक आणि सुतमाला भेट देऊन आश्रमाचे अध्यक्ष टीआरएन प्रभू यांनी राज्यपालांचा सत्कार केला. यानंतर त्यांनी आदि नीवास, बा कुटी, बापू कुटी आणि येथे असणारा ऐतिहासिक वास्तू आणि वास्तू दोन्हीची पाहणी केली. बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना करण्यात आली. यानंतर साध सात्विक जेवण केले. त्यानंतर आराम केला.
यानंतर त्यांनी सेवाग्राम येथे कपास से कपडा निर्मित केंद्रातून पांढरा खादीचा कपडा पाहिला. यावेळी त्यांना खादीचा मोह आवरला नसल्याने अखेर त्यांनी खादीचे पांढरा 9 मीटर कापड घेतले.