महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शासकीय विश्रामगृहच बनले दारू पार्टीचा अड्डा - liquor party

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना विश्रामगृहात दारू पार्टी होत असल्याची माहिती मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांनी  शहर पोलिसांना घटनास्थळी पाठवत कारवाईचे आदेश दिले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांना तिघे जण दारू पिताना आढळून आले. यातील दोघे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असल्याचे सांगितले जाते.

शासकीय विश्रामगृहच बनले दारु पार्टीचा अड्डा

By

Published : Jul 9, 2019, 9:14 AM IST

वर्ध्या- शहरातील शासकीय विश्रामगृहात दारूच्या रिकाम्या बाटल्या मिळणे काही नविन नाही. मात्र दारू पिनारे सराईत कोण? याचा थांगपत्ता कोणालाच लागत नव्हता. परंतू शहर पोलिसांना शासकिय विश्रामगृहाला दारूचा अड्डा बनवलेल्यांना रंगेहात पकडण्यात यश आले आहे. पोलिसांनी यांच्यावर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शासकीय विश्रामगृहात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच मिळाल्याची बातमी 'ईटीव्ही भारताने' यापूर्वीच दाखवली होती. रविवारी संध्याकाळी एका फोनवरून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना विश्रामगृहात दारू पार्टी होत असल्याची माहिती मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांनी शहर पोलीसांना घटनास्थळी पाठवत कारवाईचे आदेश दिले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांना तिघे जण दारू पिताना आढळून आले. यातील दोघे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. अशोक मेश्राम, देविदास पाटील आनंद रामचंद्र फाले, अशी तिघांची नावे आहेत. तर यांना दारू पिण्यास बसू देणारा खानसामा अनिल जगताप अशा चौघांवर दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात साह्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय ठोंबरे प्रेमदेव सराटे, मिलिंद पाईकवार यांनी केली आहे. यात पोलिसानी दारूची बॉटल फरसाण आणि दारू पिण्यासाठी वापरले जाणारे ग्लास जप्त केलेत. यात चौघांची वैयक्तिक जामिनावर सुटका झाली आहे. मात्र दारू पार्टी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

शासकीय विश्रामगृहच बनले दारू पार्टीचा अड्डा


वर्ध्याचे विश्रामगृह हे दारू पिण्याचा सुरक्षित अड्डा बनला आहे. नुकतेच पाटबंधारे विभागाचा कार्यलयात सायंकाळी दारू पित असल्याचे पत्र काढण्याचे प्रकरण ताजे असताना आता विश्रामगृहात दारूची पार्टी होत असल्याचे उघडकीस आले. यामुळे जिल्ह्यात दारू विक्रीवर पोलिसांचा वचक राहिला की नाही? असा प्रश्न पडू लागला आहे.

अभियंत्यांनी झटकली जबाबदारी
या प्रकारणाबद्दल अभियंता संजय हातमोडे यांना माहिती विचारली असता. मला यातले काहीच माहीत नाही. पोलिसानी कारवाई केली आहे. काही कागदपत्र आल्यास माहीत पडेल. यामुळे अद्याप माझ्या निदर्शनास दारू पिताना कोणी आले नसल्याचे कनिष्ठ अभियंता संजय हातमोडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details