वर्धा-येथील हिंगणघाट शहरात रिमडोह येथील लेआऊटमध्ये एका अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळला आहे. या अल्पवयीन तरुणीची धारधार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. ही तरुणी हिंगणघाट शहरातील रहवासी असल्याचे उघडकीस आले आहे.
थरारक.. मित्रानेच केली मैत्रिणीची गळाचिरुन हत्या - murder news wardha
हिंगणघाट शहरापासून तीन किमी अंतर असलेल्या रिमडोह शिवारात द्वारका नगरीच्या परिसरात रविवारी हत्या झाल्याचे तपासात पुढे आले. यातील तरुणीच्या हातावर असलेले नाव पाहून पोलिसांनी शोध घेतला असता, ती हिंगणघाट शहरातील असल्याचे निष्पन्न झाले.
रिमडोह येथील पोलीस पाटील कल्पना ऊईके यांनी याबाबत हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यविर बंडीवार यांनी डीबी पथकाचे निलेश तेलरांधे, सचिन भारशंकर, सुनील पाऊलझाडे यांना सूचना देत खुनातील आरोपीच्या शोध सुरू केला. यात नांदगाव येथील पंकज राजू तडस वय १९ यास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. यात चौकशी दरम्यान खुनाची कबुली दिली आहे.
दरम्यान, नांदगाव येथील पंकज राजू तडस याच्याशी तीचा वाद झाला होता. यात रागाच्या भरात पंकज याने हत्या केल्याची माहिती, पोलीस निरीक्षण सत्यविर बंडीवार यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना दिली.