वर्धा - कोरोना काळात रेमडेसिवीर सारखे उत्पादन तयार करणारी जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी वर्धा जिल्ह्यात आहे. या कंपनीमुळे विदर्भातील इतर औषधी कंपन्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल. यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जाईल, असे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले. त्यांनी जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीला भेट देऊन रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मितीची पाहणी केली.
माहिती देताना पालकमंत्री सुनील केदार हेही वाचा -सरकारी दरात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेल, गोर गरिबांचे वाचेल प्राण - नितीन गडकरी
जेनेटिकने भारतातील नांमाकित हाफकिन या औषध निर्मिती कंपनीसोबत काम करण्याचे सुद्धा आवाहन केले. यावेळी जेनेटिक सायन्सेस कंपनीचे महेंद्र क्षीरसागर यांनी कंपनीमध्ये होत असलेल्या उत्पादनाबाबत पालकमंत्री केदार यांना माहिती दिली.
जेनेटिक कंपनीत रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मितीला गुरुवारी सुरवात झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा कंपनीती पाहणी करून निर्मितीचा आढावा घेतला. जेनेटिक कंपनीत रेमडेसिवीर इंजेक्शनचे दररोज 30 हजार व्हायल निर्माण होणार असून यामुळे कोरोना विरुद्ध लढ्यात मदत मिळणार आहे. इंजेक्शनचा होत असलेला तुटवडा आणि काळाबाजार रोखण्यासाठीसुद्धा फायदा होणार आहे.
हेही वाचा -वर्ध्यात गळती रोखल्याने 5 मेट्रिक टन ऑक्सिजनची वाचवतोय इतरांचा जीव