वर्धा- आम्ही विश्वास ठेवत गंगा आंदोलन मागे घेतले, पण गंगेचे पुत्र म्हणून घेणारे पंतप्रधानांना मागील चार-पाच वर्षात एकदाही गंगेची आठवण आली नाही. २० हजार करोडचे बजेट करूनही गंगेची बिमारी दुरुस्त झाली नाही. गंगेला हृदय रोग होता. पण, उपचार दातांचे डॉक्टर करत होते. उपचार करूनही काही फायदा झाला नाही. आज गंगा आयसीयूमध्ये आहे. ती मेली तर सर्व नद्या मरून जाईल, अशी चिंता व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता गंगा बचाव मोहिमेवर जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी टीका केली.
माहिती देताना जलपुरुष राजेंद्र सिंह राजेंद्र सिंह वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन येथे आयोजित जलसाक्षरता कार्यशाळेत बोलत होते. यावेळी ते दिवंगत प्रोफेसर जी.डी. अग्रवाल आणि गंगा नदीवर आधारित पुस्तकावर बोलले. त्यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली. शिवाय, गंगा नदीसह पाण्याचे महत्व सांगून आजच्या परिस्थिवर भाष्य केले.
जर गंगेला चिकित्सा करून उपचार करू शकत नसेल तर या पृथ्वीवर जगण्याचा काही नैतिक अधिकार नाही, असे अग्रवाल म्हणायचे. त्यांनी गंगेसाठी ११० दिवस उपोषन केले. "मै गंगा का बेटा हु, मुझें गंगाने बुलाया है" पण एक दिवससुद्धा पंतप्रधानांनी फोन करून अग्रवालांशी संपर्क केला नाही. पवित्र गंगेच्या मुला मुलींनी तिच्यावर उपचार केला नाही तर ती मरून जाईल. गंगा मरण पावल्यावर दुसरी कुठलीच नदी वाचू शकणार नाही. गंगा तीच सर्वोच्च नदी आहे. तिच्यामध्ये १७ रोगांवर उपचार करण्याची ताकद असल्याचे राजेंद्र सिंह यांनी सांगितले.
जगात पेयजलचे मापक मानक पाहता अश्या प्रकारचे पाणी जगात कुठल्याच नदीत वाहत नाही. बापूच्या भूमीत प्रोफेसर जी.डी अग्रवालचा उल्लेख करण्यात आला त्यासाठी मी आभारी आहे. ज्यावेळी गंगा निर्मल होईल तेव्हाच मी शांत बसेल. महाराष्ट्र सरकारने जलसाक्षरतेचा अभियान चालवत चांगले काम सुरू केले आहे. या अभियानातून लोकं नदी प्रवाह आणि पाणी यासोबत जुडले पाहिजे. हे खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत हृदय, बुद्धी आणि हात जुळणार नाही, तोपर्यंत हे काम होणार नाही, तोपर्यंत जलसाक्षरता होणार नाही, असेही जलपुरुष राजेंद्र सिह म्हणाले.
हेही वाचा-वर्धा-आर्वी मार्गावर भरधाव वाहनावर नियंत्रण सुटल्याने अपघात; एक ठार दहा जखमी