वर्धा- ज्येष्ठ गांधी विचारक, चेतना विकासच्या अग्रणी व स्त्री सक्षमीकरणाच्या कृतीशील मार्गदर्शक सुमनताई बंग यांनी सोमवार (3 मे रोजी) दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान सेवाग्राम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने समाजमनावर आपला ठसा उमटवला होता.
स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने समाजमनावर उमटवला होता ठसा
सुमनताई या महात्मा गांधी यांचे अनुयायी व अर्थतज्ज्ञ दिवंगत ठाकूरदास बंग यांच्या सहचारिणी व समाजसेवी अशोक बंग व डाॅ. अभय बंग यांच्या मातोश्री आहेत. सुमनताईंनी स्वतःच्या कर्तृत्वाने व व्रतस्थ सेवाकार्याने समाजमनावर आपला ठसा उमटवला होता. बचत गटाचे काम देशपातळीवरही फारसे रुळले नसताना, त्या काळात वर्धा जिल्ह्यातील परितक्त्या व विधवा स्त्रियांना सोबत घेऊन बचत गटांचे जाळे त्यांनी विणले. आयुष्यभर स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी कार्यरत असतानाच शाश्वत शेती, खादी व शिक्षण प्रणालीत प्रयोगशीलता, निसर्गोपचार, कांचनमुक्ती, सामूहिक जीवन, युवक युवतींसाठी लैंगिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, पती-पत्नी संमेलन, सासू-सून संमेलन असे अनेक अभिनव उपक्रम निस्वार्थपणे सुमनताईंनी त्यांच्या जीवन प्रवासात राबविले.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित