वर्धा -जिल्ह्यातील पवनार येथील आश्रमात विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध राज्यातून लोक मैत्री मिलन सोहळ्यासाठी आले होते. तीन दिवसाच्या सोहळ्यात प्रत्येक जण कुठलीही ओळख नसताना एक दुसऱ्या सोबत ओळख करताना 'यह मेरे अच्छे मित्र है' असा उल्लेख करत असल्याचे दिसून आले. मैत्री या शब्दातच एक व्यक्ती कुठलाही भेदभाव न करता दुसऱ्या व्यक्तीशी जुळला जातो. अशीच मैत्री व्हावी यासाठी एक अनोखा उपक्रम पवनार येथील आश्रमात राबवण्यात आला होता, पाहुयात त्याचा खास रिपोर्ट...
पवनार आश्रमात मैत्री मिलन सोहळा हेही वाचा... 'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहिमेला कोल्हापुरात तरुणांचा मोठा प्रतिसाद
पवनार आश्रमात मैत्री मिलन दिनी अरनाज खान यांनी 'मूव्ह बाय लव' ही संकल्पना मांडली होती. यात एका टेबलावर हृदयाचा आकाराचे कागदी स्टिकर तयार केले होते. यात प्रत्येक व्यक्तीने एक संदेश शब्द लिहायचा. कोणी यात सत्य लिहीले, कोणी करुणा तर कोणी प्रेम लिहीले. ज्याला यातील एक शब्द आवडेल त्यावर त्याने स्वतःचे नाव लिहायचे आणि ते स्वतःच्या शर्टवर लावायचे. या सोबत एक कोरा कागद घेऊन त्यात स्वतःला आवडणार एक शब्द लिहायचा आणि तो इतरासाठी सोडून द्यायचा. आता हा स्वतः लिहलेला शब्द इथे आलेल्या अनुयायी पैकी कोणाजवळ दिसला तर त्याच्याशी बोलून आपल्या मैत्रीचे सुरवात करायची, अशा प्रकारे मैत्रीसाठी एक आगळा वेगळा उपक्रम पवनार मध्ये राबवण्यात आला होता.
हेही वाचा.. 'बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजप-शिवसेनेची व्हिडिओबाजी; सेनेला शहाणपण शिकवण्याची गरज नाही'
पवनार येथील तीन दिवसीय सोहळ्यात सहा स्वयंसेवकांनी ही संकल्पना राबवली. अरनाज खान, केजल सावला, अनिरुद्ध गावकर, संतोष पांडे, पंक्ती आणि पंखुरी या दोन जुळ्या बहिणी यांनी हा उपक्रम राबवला होता.