वर्धा - जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू झाला. यात दोन महिला आणि एका आजोबाचा नातवासह मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी शेताचे कामे आटोपून परत जात असताना नाल्याला अचानक पूर आल्याने काही पुरुष मजूर आणि महिला बैलगाडी पुलावर फसली. यात दोन महिला पाण्याच्या प्रवाहात वाहू गेल्या. मृतांमध्ये सोनेगाव स्टेशन येथील चंद्रकला लोटे आणि तळेगाव टालाटूले येथील बेबी भोयर यांचा समावेश आहे. रात्री उशिरा दोघींचे मृतदेह आढळले.
वर्ध्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू - वर्धा बुडून मृत्यू
वर्धा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू झाला. यात दोन महिला आणि एका आजोबाचा नातवासह मृत्यू झाला. दोन्ही घटना नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये बैलगाड्या वाहून गेल्याने घडल्या.

आज सकाळी घडलेल्या दुसऱ्या घटनेत सोनेगाव येसंबा येथून येणाऱ्या नाल्यात गोजी येथील १२ वर्षीय मुलाचा आणि त्याच्या आजोबाचा मृतदेह आढळला आढळला. दोघेही धोत्रा येथून सावली सासताबाद येथे जात होते. अचानक नाल्याचा प्रवाह वाढल्याने आजोबा आणि नातू बैलगाडीसह वाहून गेले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
दरम्यान, वर्धा तालुक्यात शुक्रवारी 15.58 मिली मीटर तर जिल्ह्यात 11. 67 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाळ्यात पूल वाहून जाण्याच्या अनेक दुर्घटना होतात. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यास तो पार करण्याचा धोका नागरिकांनी घेऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून केले जात आहे.