वर्धा- आर्वी तालुक्यातील विरुळ आकाजी येथे जंगलात चराईसाठी गेलेल्या गायींनी कडब्याच्या धांड्याचा मुळा खाल्ल्याने १४ गायींना विषबाधा झाली असल्याची माहिती पशुवैदकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात चार गाईंचा मृत्यू झाला असून दहा गायींची प्रकृती गंभीर आहे. याची माहिती मिळताच जनावरांवर उपचार सुरू करत पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्याने इतर गायींना जीवनदान मिळाले आहे.
चराईदरम्यान कडब्याच्या मुळा खाल्ल्याने 14 गायींना विषबाधा; ४ गायी दगावल्या - poisoining
विरुळ आकाजी येथे सकाळी गावातील गुराख्याने जवळपास १०० गायी घेऊन चाराईसाठी गेला. दुपारी अचानक गायीनी माना टाकल्या. तर काही जमिनीवर लोळल्या. हे चित्र पाहताच गुराख्याने गायींनी काहीतरी खाल्ल्याचे लक्षात येताच याची माहिती गावात दिली. त्यानंतर गायी मालकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले.
विरुळ आकाजी येथे सकाळी गावातील गुराख्याने जवळपास १०० गायी घेऊन चाराईसाठी गेला. दुपारी अचानक गायीनी माना टाकल्या. तर काही जमिनीवर लोळल्या. हे चित्र पाहताच गुराख्याने गायींनी काहीतरी खाल्ल्याचे लक्षात येताच याची माहिती गावात दिली. त्यानंतर गायी मालकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले. यावेळी विषबाधा झाल्याचे कळताच उपचार सुरू केले, मात्र तोपर्यंत चार गायी दगावल्या होत्या. इतर गायींवर उपचार सुरू आहेत.
गावातील सुनील सालनकार यांनी रखरखत्या उन्हात आजारी पडलेल्या जनावरांसाठी टॅकरने पाण्याची व्यवस्था केली. सर्व जनावरांना पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने उपचाराला मदत झाली.