महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Hyderabad Highway Robbery : नागपुर-हैद्राबाद महामार्गावर गाडी अडवून लुटली साडेचार कोटींची रोकड; पाच आरोपींना अटक

Nagpur Hyderabad Highway Robbery : कंपनीची कॅश घेऊन जाणाऱ्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याची गाडी अडवून तब्बल साडेचार कोटी रुपयांची रक्कम लुटल्याची गंभीर घटना नागपुर हैद्राबाद महामार्गावर घडली होती. या प्रकरणी वर्धा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलीय. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

Nagpur Hyderabad Highway Robbery
Nagpur Hyderabad Highway Robbery

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 11:13 PM IST

पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रीया

वर्धा Nagpur Hyderabad Highway Robbery : नागपुर हैद्राबाद महामार्गावर वडनेर नजीकच्या पोहणा नागपूरहुन हैद्राबादकडे कंपनीची कॅश घेऊन जाणाऱ्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याची गाडी अडवून तब्बल साडेचार कोटी रुपयांची रक्कम लुटल्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 13 सप्टेंबर पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी लुटण्यात आलेल्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक करण्यात वर्धा पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी वर्ध्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. ही रक्कम गुजरात येथील कमलेश शहा या व्यक्तीची माहिती यावेळी देण्यात आली. हा कमलेश शहा कोण? याबाबत पोलीस तपास करीत आहे. (Nagpur Hyderabad Highway Robbery)

आरोपीच्या शोधासाठी 15 टीम : गुजरात येथे राहणारा अठ्ठेसिंग भगवानजी सोळंकी हा कारने नागपुर-हैद्राबाद महामार्गाने हैदराबादकडे जात असताना होंडा सिटीने येणाऱ्या आरोपींनी गाडी आडवी लावून अडविले. शस्त्राचा धाक दाखवीत तब्बल साडेचार कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. वर्धा पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या 15 टीम तयार केल्या. पंधरा टीमच्या साहाय्याने विविध भागात आरोपीचा शोध घेण्यात आला. यात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 कोटी 46 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. उर्वरित रक्कमेचा शोध घेतला जात आहे. नमुद आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असुन त्यांचेकडून गुन्हयात वापरलेले हत्यार, दुचाकी वाहन तसेच उर्वरित रोख रक्कम जप्त करण्याबाबत तपास सुरू आहे.

पोलीसांची कारवाई :सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन याचे मार्गदर्शन व निर्देशाप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक सागर रतनकुमार कपडे उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट रोशन पंडीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कापडे, संतोष दरेकर दिपक वानखेडे, सदिप गाडे, संजय मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड यांच्या पथकाने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details