महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक - शिवसेना माजी जिल्हा प्रमुख

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या विरोधात आर्वी पोलीस ठाण्यात खंडणी मागीतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणात आर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक,
शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक,

By

Published : Jun 1, 2021, 4:04 AM IST

वर्धा - शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांच्या विरोधात आर्वी पोलीस ठाण्यात खंडणी मागीतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणात आर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आर्वी कौडण्यापूर रस्त्याचे काम करणाऱ्या 'शैलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमीटेड कंपनी'च्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'तुमच्या गाड्या चालु देणार नाही'

आर्वी अमरावती मार्गावर आर्वी ते कौडण्यापूर मार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्ताचे कंत्राट अमरावती येथील 'शैलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमीटेड' कंपनी देण्यात आला आहे. नुकतीच कामाला सुरुवात झाली असल्याने, मुरूम पसरवण्याचे काम सुरू आहे. यात मुरूम टाकण्याचे काम सुरू असतांना रविवारी 30 मे रोजी निलेश देशमुख यांनी चार डंपर अडवले. याबाबातची माहिती सुपरवायझर अनिकेत वसु यांना मिळाळ्यावर सचीन धांडगे आणि वसु घटनास्थळी पोहचले. यावेळी निलेश देशमुख यांनी रस्त्याचे बांधकाम बंद करा. या रोडने तुमच्या गाड्या चालु देणार नाही. हा रोड मी मंजुर करुन आणला आहे, यामुळे मला एक लाख रुपये दिल्या शिवाय तुम्हाला काम करता येणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

'आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल'

सोमवारी नांदपुर दरम्यान सहा गाड्या निलेश देशमुख यांनी अडवल्या आहेत. यावेळीही अध्याप मला एक लाख रुपये मिळाले नाही, तुम्ही काम कसे सुरू केले असं म्हणत शिवीगाळ करत काम बंद केल्याचा आरोप, तक्रारदार अनिकेत वसु यांनी केला आहे. आर्वी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, माजी निलेश देशमुख यांना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details