वर्धा -मरकसुर येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या सांबराच्या पिल्लाला जीवदान मिळाले आहे. हे पिल्लू विहिरीत पडल्याची माहिती वन विभागाला मिळताच त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत या पिल्लाला बाहेर काढून जंगलात सोडले आहे.
विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान - sambar save from well wardha news
कारंजा तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत जंगलातून हे सांबराचे पिल्लू शेताकडे पळत येत होते. त्यानंतर हे पिल्लू अचानक नागोराव सय्याम यांच्या शेतातील विहिरीत पडले. ही घटना समजताच शेतात काम करणाऱ्या लोकांनी वन विभागाला संपर्क साधला.
हेही वाचा -परतीच्या पावसाने द्राक्ष बागयतदारांचे मोडले कंबरडे, कोट्यवधी रुपयांचे नुकसान
कारंजा तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत जंगलातून हे सांबराचे पिल्लू शेताकडे पळत येत होते. त्यानंतर हे पिल्लू अचानक नागोराव सय्याम यांच्या शेतातील विहिरीत पडले. ही घटना समजताच शेतात काम करणाऱ्या लोकांनी वन विभागाला संपर्क साधला. दुपारी वन विभागाच्या पथकाने शेतात जाऊन विहिरीतुन या पिल्लाला बाहेर काढले. त्यानंतर या पिल्लाला कोणतीही इजा न झाल्याची खातरजमा करून जंगलात सोडण्यात आले.