वर्धा- पाण्याच्या शोधात असलेले चितळ निर्माणाधीन विहिरीत पडल्याची घटना शनिवारी घडली. ही घटना तळेगांव येथील सिडेंट कंपनीच्या परिसरात घडली. वनविभागाला माहिती मिळताच आणि पिपल्स फॉर अॅनिमलच्या सदस्यांनी चितळ आणि त्याच्या पिलाला सुखरूप बाहेर काढत जीवनदान दिले.
पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या चितळला पिलासह वाचविण्यात वनविभागाला यश - Parag Dhobale
पाण्याच्या शोधात असलेले चितळ निर्माणाधिन विहिरीत पडल्याची घटना शनिवारी घडली. चितळ आणि त्याच्या पिलाला सुखरूप बाहेर काढत जंगलात सोडण्यात आले आहे.
![पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या चितळला पिलासह वाचविण्यात वनविभागाला यश](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3385465-1106-3385465-1558845283903.jpg)
जिल्ह्यातील तळेगाव वनपरिक्षेत्र विभागांतर्गत असलेल्या सिडेंट कंपनीच्या परिसरातील मागील बाजूस शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू आहे. पाण्याच्या शोधात असलेले चितळ आणि तिचे पिल्लू या विहिरीत पडले होते. विहिरीला पाणी असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या घटनेची माहिती तळेगाव वनपरीक्षेत्र अधिकारी यांना मिळताच ते घटना स्थळावर दाखल झाले. परिसरातीलच पीपल्स फॉर अॅनिमल्सचे मयुर वानखेडे यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर मयुर यांनी मोठ्या दोराच्या साह्याने चितळला सुखरूप बाहेर काढले. फय्याज अली, पप्पु भुयार यांनी सहकार्य केले. चितळ व तिचा बछडा यांना कोणत्याही प्रकारची जखम झाली नसल्याची आणि सुखरुप असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जंगलात सुखरूप सोडले.