महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्याच्या सतर्कतेने वाचले नीलगाईचे प्राण, वन विभागासह शेतकऱ्यांचे प्रसंगावधान - wardha

कारंजा येथील रघुनाथ नासरे यांच्या शेतातील विहीरीत पडलेल्या नीलगाईला वनविभागाने 'रेस्क्यू ऑपरेशन' करत वाचवले.

नील गायीला विहीरीतून बाहेर काढताना

By

Published : Feb 11, 2019, 8:41 PM IST

वर्धा- कारंजा येथील रघुनाथ नासरे यांच्या शेतातील विहीरीत पडलेल्या नीलगाईला वनविभागाने 'रेस्क्यू ऑपरेशन' करत वाचवले. वनविभागाचे पी. पी. कडसाईत, रामू उईके, पी. जी. खवसी, आकाश भलावी, गुलाब देवासे, दिनेश गिरी, हिंगवे आणि शिवारातील शेतकऱ्यांच्या मदतीने निलगाईला वाचवण्यात आले आहे.

नील गायीला विहीरीतून बाहेर काढताना
नील गायीला विहीरीतून बाहेर काढताना कारंजा येथील शेतकरी विनोद ठोंबरे हे आपल्या शेतात गेले. त्यांना लगतच्या रघुनाथ नासरे यांचा शेतातील विहिरीतून आवाज येत असल्याने ते पाहायला गेले. यावेळी त्यांना विहरीमध्ये नीलगाय आढळून आली. त्यांनी शेतमालक रघुनाथ महादेव नासरे याना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. रघुनाथ नासरे यांनी लगेच शेताकडे धाव घेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी पी. पी. कळसाईत यांना महिती मिळताच ते आपल्या वनविभागाच्या चमूसह घटनास्थळी पोहचले. निलगाईला विहिरीतून बाहेर काढण्याकरता वनविभागाच्या चमूने काम सुरू केले.

१ तासाच्या अथक परिश्रमाने नीलगाईला विहीरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. पी. पी. कडसाईत, रामू उईके, पी. जी. खवसी, आकाश भलावी, गुलाब देवासे, दिनेश गिरी, हिंगवे आणि शिवारातील शेतकऱ्यांच्या मदतीने निलगाईला वाचवण्यात आले. रेस्क्यूनंतर निलगाईला जंगल परिसरात सोडण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details