वर्धा- महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण केल्यानंतर सुटीचा आनंद न घेता कारंजा वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या बांगडापूरच्या महाश्रमदानात त्यांनी सहभाग घेतला. यात गावकाऱ्यांसोबत वन विभाग आणि इतर प्रशासकीय विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
सुटीच्या दिवशी आरामाएवजी श्रमदान करत प्रशासकीय कर्माचाऱ्यांचे दुष्काळाशी दोन हात - aamir khan
सुटीचा दिवस पाहता बहुतेक अधिकारी, कर्मचारी घरी आराम करताना किंवा फिरायला जाताना दिसतात. वर्ध्यात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले.

सुटीचा दिवस पाहता बहुतेक अधिकारी, कर्मचारी घरी आराम करताना किंवा फिरायला जाताना दिसतात. वर्ध्यात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. १ मे रोजी वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावात आयोजित महाश्रमदानात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गावातील तसेच बाहेरून आलेल्या श्रमदात्यांच्या मदतीने पाणी साठवण्यासाठी बांध, चर तयार करण्यात आले आहेत. हे काम आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे हे काम महत्वाचे ठरणार असल्याचे कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी दादा राऊत यांनी सांगितले.
सध्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय पर्यजन्यमान कमी झाल्याने पाणी टंचाईने एप्रिल महिन्यातच डोके वर काढले आहे. त्यामुळे याला लढा देण्यासाठी मागील ३ वर्षापासून वर्धा जिल्ह्यातील आर्वी, कारंजा, सेलू आणि देवळी या चारही तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळासोबत लढण्याची तय्यारी केली जात आहे. आज अनेक गावात महाश्रमदान करण्यात आले. याला मिळणारा प्रतिसाद आणि श्रमदात्यांचे श्रम गावकऱ्यांचे मनोबल वाढवण्यास मदत ठरत आहे.