वर्धा - जिल्ह्यातील अनेक भागात मागील आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे लाल नाला प्रकल्पात 93 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले असून 1090 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले, 1090 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
जिल्ह्यातील अनेक भागात मागील आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे लाल नाला प्रकल्पात 93 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले असून 1090 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
http://10.10.50.85:6060/reg-lowres/08-August-2019/mh-war-01-lalanala-gate-open-vis1-7204321_08082019213030_0808f_1565280030_627.mp4
यंदाच्या पावसाळ्यात लाला नाला प्रकल्पाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुपारी पाच वाजतापासून दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. पावसाचा अंदाज घेऊन पुढील नियोजन केले जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.