वर्धा - आजपासून (दि. 8 मे) पाच दिवस कडक निर्बंधाला वर्ध्यात सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात वाढती रुग्णसंख्या पाहता मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत जात असून मृत्यूही होत आहे. यासाठी वर्ध्यातील संसर्ग साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात फक्त वैद्यकीय सेवा आणि उपचाराची गरज असल्यास बाहेर पडण्याचा सूचना दिल्या आहेत.
या पाच दिवसात अत्यावश्यक सेवेचे दुकान ग्राहकांसाठी बंद असणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या किराणा दुकान असो की भाजीपाला या सर्वांना सकाळी 7 ते 11 पर्यंत घरपोच पार्सल सेवा देण्यास मुभा असणार आहे. दुकान किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई पिठाची गिरणी इत्यादी दुकाने तसेच खाद्यपदार्थाची सर्व दुकाने बंद राहील. कोंबडी, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी यासह पाळीव प्राण्याच्या खाद्यपदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामात व्यक्तीसाठी तसेच संस्थासाठी सबंधीत असणाऱ्या साहित्याच्या निगडीत दुकाने, गॅस एजन्सीला सकाळी 11 वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येणार आहे.
या काळात हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या पाच दिवसांत कोणीही रस्त्यावर फिरू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. यासह विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शहरात आज विविध ठिकाणी बंदोबस्त लावून पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. यात विनाकारण फिरणाऱ्यांवर नगर परिषदेकडून 9 पथकांमार्फत 44 विनाकारण फिरणारे तर यात अत्यावशेक सेवा देताना आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. पण, ज्याच्याजवळ कोरोना अहवाल नव्हते, अशा 44 व्यक्तींवर 500 रुपये प्रमाणे 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच 18 दुकाने सील करून 12 दुकानावर 2 हजार रुपये प्रमाणे 24 हजार दंड नगर परिषदेकडून वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा -जेनेटिक कंपनीमुळे विदर्भातील औषधी उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यास मदत - पालकमंत्री केदार