महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात किराणा मॉलची भीषण आग नियंत्रणात; एका महिलेचा मृत्यू - मीनल मॉल

हिंगणघाट येथील मीनल मॉल या किराणा दुकानाला पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले असून, संबधित घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

वर्ध्यात किराणा मॉलला भीषण आग लागली आहे.

By

Published : Sep 30, 2019, 8:38 AM IST

Updated : Sep 30, 2019, 11:31 AM IST

वर्धा- हिंगणघाट येथील मीनल मॉल या किराणा दुकानाला पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले असून, संबधित घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पाच अग्निशमन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. हिंगणघाट, वर्धा, देवळी, पुलगाव, वर्धा तसेच नागपूर महानगरपालिकेचे बंब देखील पोहचले होते.

वर्ध्यात किराणा मॉलची भीषण आग नियंत्रणात

आग लागल्याचे निदर्शनास येताच सर्वांनी बचावासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी काही जणांनी वरच्या मजल्यावरून उड्या घेतल्याने ते बचावले आहेत. अद्यापही मॉलचे चालक विजय मुथा यांची आई आतमध्ये अडकून असल्याची माहिती मिळत आहे. तसेच जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलवले असून, आगीची तीव्रता पाहता बाजूच्या इमारती खाली करून घेण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आगीमध्ये संपूर्ण मॉल बेचीराख झाला असून, जवळपास २ कोटींचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. तसेच पोलीस पंचनामा करत असून, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा रत्नागिरीत 'बर्निंग कार'चा थरार, सुदैवाने चालक बचावला

या ठिकाणी राजकीय मंडळींचीही गर्दी झाली आहे.

Last Updated : Sep 30, 2019, 11:31 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details