वर्धा- जिल्ह्यातील समुद्रपूर वडगाव येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास गावालगत असलेले विद्युत ट्रान्सफार्मरच्या तारातून निघालेल्या ठिणगीने गुरांचा गोठा जळून खाक झाला. आग वेळेतच गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने मोठी हानी टळली. आगीत सुभाष मुन यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
वर्ध्यात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत गोठा जळून खाक - आग
वडगाव येथे सुभाष मुन यांचा बैलाचा गोठा आहे. या गोठ्याला आग लागल्याने नुकसान झाले. आग लागली त्यावेळी गोठ्यात बांधून असलेले बैल नागरिकांनी गोठ्याबाहेर काढले. त्यामुळे या दोन बैलांचे प्राण वाचले.
वडगाव येथे सुभाष मुन यांचा बैलाचा गोठा आहे. या गोठ्याला आग लागल्याने नुकसान झाले. आग लागली त्यावेळी गोठ्यात बांधून असलेले बैल नागरिकांनी गोठ्याबाहेर काढले. त्यामुळे या दोन बैलांचे प्राण वाचले. मात्र, या आगीत सुभाष मुन यांची बैलगाडी, जनावरांचा चारा आणि शेतीचे साहित्य जळून भस्मसात झाले. ही आग पाहता पाहता गावातील सुनिल मुन यांच्या घरापर्यंत पोहोचली. नागरिकांनी सतर्कतेने तत्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. नागरिकांमुळेच आज वडगाव आगीपासून थोडक्यात बचावले असून मोठी हानी टळली.
या आगीत गावातील सहा ते सात खतांचे ढिगारे जळून खाक झाले. आग वीजवितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार उघड्या तारांसंदर्भात माहिती देऊनही त्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. त्यामुळी ही आग लागल्याचे गावकऱयांनी सांगितले.