वर्धा- शहर नगरपालिकेच्या डम्पिंग यार्डला आग लागल्याची घटना घडली. ही आग आज पहाटे ४ च्या सुमारास लागल्याची माहिती मिळाली आहे. सध्या आग आटोक्यात आली असून घटनास्थळी पालिकेचे अधिकारी दाखल झाले आहे.
वर्ध्याच्या इंझापूर डम्पिंग यार्डला आग, खत निर्मिती केंद्र जळून खाक
डम्पिंग यार्डला लागलेली आग घनकचरा व्ययस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मिती केंद्रात जाऊन पोहोचली. त्यामुळे, केंद्रातील मशिने देखील आगीत जळून खाक झालीत. आग लागल्याची माहिती मिळताच इंझापूर येथील सरपंचाने नगरपालिकेला माहिती दिली.
आग लागल्याचे दृश्य
डम्पिंग यार्डला लागलेली आग घनकचरा व्ययस्थापन प्रकल्पाच्या खत निर्मिती केंद्रात जाऊन पोहोचली. त्यामुळे, केंद्रातील मशिने देखील आगीत जळून खाक झालीत. आग लागल्याची माहिती मिळताच इंझापूर येथील सरपंचाने नगरपालिकेला माहिती दिली. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली असून ती धुमसत आहे.
हेही वाचा-वर्ध्यात पालक मंत्र्याच्या उपस्थितीत महिला हिंसाचारविरोधात सामूहिक उपवास अन् आत्मचिंतन