वर्धा -समुद्रपूर तालुक्यातील निंभा येथील एसबीआय बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकावर स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बँकेत शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. या दरम्यान बँक व्यवस्थापक बाहेर जिल्ह्यातून परतले. तसेच होम क्वारंटाइन न होता थेट नागपूरला निघून गेले. ही बाब जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी स्वतः भेट दिल्यानंतर समोर आली. यामुळे शाखा व्यवस्थांपकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप हंगाम सुरू असताना पीक कर्जाची प्रक्रिया थंडावली आहे. मोठ्या प्रमाणात प्रकरणं प्रलंबित असताना समुद्रपूर तालुक्यातील निंभा शाखेचे बँक व्यवस्थापक बॅंकेत थांबत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला. याबाबत अनेक तक्रारी आमदार समीर कुणावार यांच्याकडे देखील आल्या. याच दरम्यान बँक व्यवस्थापक एक दिवस नागपूरातील बँकेत आले. याची माहिती तहसीलदार राजू रणवीर यांना मिळाली. त्यांनी बँक व्यवस्थापकास स्वतःची तपासणी करून त्यांना क्वारांटाइन होण्याच्या सुचना दिल्या. मात्र ते परस्पर निघून गेले.
हेही वाचा...अधिकाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची सरकारवर वेळ - जयंत पाटील