वर्ध्यात खासगी रुग्णालयाची तोडफोड, चौघांवर गुन्हा दाखल - महिलेवर उपाचार झाला नाही
शहरातील मागील आठवड्यात गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला घेऊन चार युवक डॉ. तोटे यांच्या रुग्णलायत आले. यावेळी प्रथमिक तपासणी करत दुसरीकडे नेण्यास सांगितले. पण दरम्यान महिलेला दुसरीकडे नेण्यात आले. पण त्यानंतर महिलेचा मृत्यू झाला.
वर्ध्यात खासगी रुग्णालयाची तोडफोड
वर्धा - शहरातील श्री हॉस्पिटलमध्ये महिलेला उपचारासाठी दाखल न करून घेतल्याच्या रागातून ४ युवकांनी त्या रुग्णालयाची तोडफोड केली. तसेच तेथील डॉक्टरलाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला आहे. यावेळी रुग्णालयाबाहेरील कारवर दगडफेक करतानाची दृ्श्ये सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर या तोडफोड प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : May 15, 2021, 1:01 PM IST