वर्धा- जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील दारूविक्रेता राकेश कांबळे मारहाण प्रकरणात गावातील उपसरपंचावर हत्येचा कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास दौड असे उपसरपंचाचे नाव आहे. तसेच त्यांच्यासह आणखी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांचा तपास सुरू आहे.
वर्ध्यात दारुविक्रेता मारहाण प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल; सावंगी मेघेच्या उपसरपंचही सहभागी - वर्धा
दारूविक्रेता राकेश कांबळेला क्षुल्लक कारणावरून चौघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली होती. यामध्ये राकेश गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दारूविक्रेता राकेश कांबळेला क्षुल्लक कारणावरून चौघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली होती. यामध्ये राकेश गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ४ आरोपी संदीप ढोके, योगेश पेटकर, मंगेश गुरनुले तसेच पंकज ठाकरेला अटक केली होती. तसेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान या प्रकरणाची चौकशी करीत असताना उपसरपंच विलास दौड यांचे पाचवे नाव समोर आले. सर्व आरोपी घटनेच्या दिवशी विलास दौड यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी दौड विरोधात हत्येचा कट रचण्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, दौड सध्या फरार असून सावंग पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे तपास ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांनी सांगितले.