वर्धा- गिरड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रासा शिवारातील गोठ्याला मंगळवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत तोंडावर असलेल्या खरीप हंगामासाठी आणलेले खत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शॉर्ट सर्किटमधून निघालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याचे सांगितले जाते.
वर्ध्यात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला लागलेल्या आगीत खताच्या पोत्यासह साहित्य जळून खाक - शेतकरी
वर्धा रासा शिवारातील गोठ्याला मंगळवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत तोंडावर असलेल्या खरीप हंगामासाठी आणलेले खत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत खताच्या पोत्यासह साहित्य जळून खाक
मंगळवारी शेतकरी अंकुश जूनघरे हे घरी झोपून असताना अचानक गोठ्याला आग लागली. यात खरीप हंगामासाठी आणलेल्या रासायनिक खताच्या ६० पिशव्या जळून खाक झाल्या. यासोबतच शेती उपयोगी ओलिताचे दीडशे पाईप, दोन पाण्याच्या मोटारी, वखर, नांगर, दतारी या साहित्याची आगीत राखरांगोळी झाली.
यामुळे खरिपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या आगीच्या ठिणगीने २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी अंकुश जुनघरे करत आहेत.
Last Updated : Jun 14, 2019, 10:53 AM IST