वर्धा -कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी बनवले आहेत. यातील कुठला भाग शेतकऱ्यांच्या विरोधात आहे तो दाखवा. बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा जास्त दरात माल विकता येऊ शकत नाही का? शेतकऱ्यांना भाव ठरवण्याचा अधिकार नाही का? हा कायदा विरोधात नाही, असे अनेकदा बोललो. एमएसपीवर आतापर्यंत इतिहासात सर्वात जास्त म्हणजे, साडे तीन लाख कोटी रुपये दिले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. गडकरी हे वर्ध्याच्या दौऱ्यावर होते.
हेही वाचा -'सगळेच उपमुख्यमंत्रीपद मागत असतील, तर अपक्षालाही ते द्यावे'
देशात गहू तांदूळ मुबलक, तर तेल आयात करावे लागते
आंतरराष्ट्रीय किंमत आणि बाजार किमतीपेक्षा एमएसपी जास्त असते. काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांनी संवाद साधावा. शेतकऱ्यांनी क्रॉप पॅटर्न बदलने गरजेचे आहे. एकीकडे जगाला पुरेल इतका तांदूळ आपल्या देशात आहे. साखर, गहू हे मुबलक प्रमाणात आहेत. 90 हजार कोटीचे तेल आपण आयात करत आहोत. यासाठी तेलबिया किंवा तेल उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी शेतीचा पॅटर्न बदलणे गरजेचे आहे. शेती क्षेत्रात समस्या आहेत. याबाबत सरकार सकारात्मक आहे. सरकारचे प्रयत्न आहे. हळूहळू समस्या सोडवल्या जातील. पण, काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आमचे सरकार शेतकऱ्यांकरिता कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी संवाद करावा, आम्ही शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी कटिबद्ध आहोत, असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले.