वर्धा - जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील न्यु बोर अभयारण्य परिसरात धानोलीजवळ वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. यामध्ये शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विठोबा दसरू वडुले असे मृताचे नाव आहे.
वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; परिसरात दहशत - tiger
विठोबा आपल्या शेतात नेहमी प्रमाणे काम करत होते. एवढ्यातच शेताला लागूनच असलेल्या उमरविहारी शिवारातील न्यु बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनमधून आलेल्या वाघाने हल्ला चढवला.
विठोबा आपल्या शेतात नेहमी प्रमाणे काम करत होते. एवढ्यातच शेताला लागूनच असलेल्या उमरविहारी शिवारातील न्यु बोर व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनमधून आलेल्या वाघाने हल्ला चढवला. वाघाने शेतकऱ्याला फरफटत ओढून जंगलाच्या दिशेने नेले. परिसरातील शेतकऱ्याला समजताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने तत्काळ रक्त सांडलेल्या दिशेने शोधमोहीम सुरू केली. यावेळी जंगलात शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन आणि दोन नातू असा परिवार आहे.
पिंकी नावाची वाघीण असण्याची शक्यता -
परिसरात दोन वाघाचा वावर आहे. यापैकी एका पिंकी नामक ३ वर्षीय वाघिणीने शेतकऱ्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून या वाघिनीचे दर्शन होत होते. तेव्हापासून या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वाघिणीने आज शेतकऱ्यांचा नरडीचा घोट घेत जीव घेतला.