वर्धा- शेतातील सर्व पिके काढण्यात आली असून पुढच्या सालासाठी शेतजमीन तयार करण्याची कामे सुरू झाली आहेत. आष्टी येथील एका शेतातील काडीकचरा बांधावर जाळताना आग जंगल परिसरात पोहचली. यामुळे वन संपत्तीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एका शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून आष्टी वनविभागांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेतातील आगीमुळे जंगलाचे नुकसान, शेतकऱ्याला वन विभागाकडून अटक
जंगलालगतच्या शेतात पालापाचोळा जाळताना काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. आग लावणार असल्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगावे, तसेच आग लावल्यानंतर आग विझेपर्यंत तिथेच थांबावे. जेणेकरून आग पसरून अनुचित प्रकार घडत नुकसान होऊ नये.
जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात जंगल वनसंपदा लाभलेली आहे. अशातच अनेक शेतजमीन जंगलाला लागून सुद्धा आहे. आष्टी तालुक्यातील वर्धापूर येथील शेतकरी रवींद्र महादेवराव ब्राह्मणे (वय ४०) असे नाव आहे. यांच्या शेत सर्वे क्रमांक ६९ मध्ये शेताला लागून जंगल आहे. शेताच्या बांधावर लागलेली आग जंगल परिसरात पसरल्याने मोठ्या प्रमाणात मौल्यवान वन्यप्रजाती, जीवजंतू जैवविविधतेत नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निष्काळजीपणे शेतात आग लावून निघून गेल्याने हा प्रकार घडला.
यात मौजा सातनूर, रोहणा, टुमणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना जंगल परिसरात आग लागल्याचे निदर्शनास आले. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, ही आग नेमकी कोणी लावली याच शोध घेण्यात आला. ही आग रवींद्र ब्राह्मणे यांनी लावल्याचे उघडकीस आले. यात शेतजमिनीवर आग लावताना निष्काळजीपणा केल्यामुळे आग जंगलात पोहचली आणि नुकसान झाले.
जंगलालगतच्या शेतात पालापाचोळा जाळताना काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. आग लावणार असल्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगावे, तसेच आग लावल्यानंतर आग विझेपर्यंत तिथेच थांबावे. जेणेकरून आग पसरून अनुचित प्रकार घडत नुकसान होऊ नये. वनविभागाला जंगल संपदा वाचविण्यासाठी सहकार्य करा, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी ईटीव्हीसोबत बोलताना सांगितले.