वर्धा - कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार बंद असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. या काळात घरातच राहून व्यायाम करून स्वतःला मानसिक आणि शाररिक पद्धतीने तंदुरुस्त ठेवू शकतो. त्यामुळे घरातच राहून व्यायाम करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन राज्याचे क्रीडामंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले आहे. व्यायाम करतानाचा स्वतःचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकला पोस्ट केला आहे.
घरात राहून व्यायाम करा स्वतःची अन् कुटुंबाची काळजी घ्या; क्रीडामंत्र्यांचे आवाहन - व्यायाम
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात घरातच राहून व्यायाम करून स्वतःला मानसिक आणि शाररिक पद्धतीने तंदुरुस्त ठेवू शकतो. त्यामुळे घरातच राहून व्यायाम करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन राज्याचे क्रीडामंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केले आहे.
सुनील केदार
हेही वाचा -गंभीर! मुंबईत आढळले 52 नवे कोरोनाग्रस्त, एकूण रुग्णांची संख्या ३३० वर
नागरिकांनी या परिस्थिती घरात राहून शासनाच्या आदेशाचे पालन करायचे आहे. मात्र, 24 तास घरात राहून काहीच न केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव जाणवू शकतो. यामुळे मानसिक विचार आणि मन मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम केलाच पाहिजे. उपलब्ध असेल त्या जागेत दोरीवर उड्या मारणे, सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग सारखे व्यायाम करू शकतो, असे केदार यांनी सांगितले आहे.