वर्धा - माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्याचा कोरोना सदृश्य परिस्थितीचा आढवा घेतला. यात मागील काळात सेवाग्राम रुग्णालयाने आणि सावंगी रुग्णालयाने चांगले काम केल्याचे त्यांनी कौतुक केले. पण सध्याची लाट पाहता एक महिना काळजी घेण्याची गरज आहे. संसर्ग आणि मृत्यूदराचे प्रमाण नियंत्रणात ठेवले पाहिजे असेही यावेळी फडणवीस म्हणाले.
कोरोना रोखण्यासाठी आणखी एक महिना काळजी घेणे गरजेचे - देवेंद्र फडणवीस - update corona news in wardha
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्याचा कोरोना सदृश्य परिस्थितीचा आढवा घेतला. व्यापारी लोकांची मागणी आहे की त्यांच्या चाचण्या झाल्या पाहिजे. ते जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सेवाग्रामच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर सावंगी मेघे रुग्णालयात जाऊन भेट देत ऑनलाईन टॅबवरून कोरोना वार्डात उपचार घेणाऱ्या रुग्णाशी संवाद साधला.
जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित होण्याचा दर हा तीन टक्के असून तो दर नियंत्रणात आहे. आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार ते प्रमाण 5 टक्के म्हटले आहे. तो 10 टक्क्यांपर्यंत मान्य केला आहे. आता सेरॉलॉजीकल सर्व्हे सुरू आहे. त्यानंतर ते प्रमाण कायम राहते का हे पाहावे लागेल. यात मृत्यूची संख्या कमी आहेच. पण तो दर नियंत्रणात ठेवावा लागणार आहे. सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयाकडून याचे नियोजन केले जात आहेच. पण कोविड केअर सेंटरची संख्या वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी बैठकीत जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली. यात सध्या जिल्ह्याची परिस्थिती चांगली असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आमदार समीर कुणावर यांनी तीन महिन्यांपूर्वी वादळी पावसाने जवळपास 350 घराचे नुकसान झाले. त्यांना अद्याप मदत देण्यात आली नासल्याचेही विरोधी पक्षनेते यांच्या निदर्शनास आणून मदत मिळवून देण्यासाठी प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात चर्चा केली.
यानंतर फडणवीस यांनी सावंगी रुग्णालयात जाऊन भेट दिली. तेथील कोविड लढ्यात स्वतःहून काम करणाऱ्या इच्छुक युवा डॉक्टरांचे कौतुक केले. तसेच कोरोनाच्या यंत्रनेच्या कामांचा आढावा घेतला. कोरोना वार्डात न जाता टॅबने रुग्णलयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधाला. कोरोनावर मात करून एका रुग्णला विरोधी पक्षनेते यांच्या हस्ते कागदपत्र देऊन सुट्टी देण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, अमादर दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, तसेच सेवाग्राम रुग्णल्याचे डीन डॉ. नितीन गगणे, सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, भाजपचे पदाधिकारी राजेश बकाने, यांच्यासह अनेक भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.