वर्धा- जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रीया सकाळी सात वाजता सुरू झाली होती. यात हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव येथील मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये सकाळी बिघाड निर्माण झाला होता. यामुळे या मतदार केंद्रावर जवळपास दीड तास मतदान प्रक्रियेचा खोळंबा निर्माण झाला होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त करत व्हीव्हीपॅट बदलल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले.
तर हिंगणघाट शहरातील संत कबीर वॉर्ड येथील समाज मंदिर बुथ क्रमांक 259 वरील ईव्हीएममध्ये सकाळी 7 वाजल्यापासून बिघाड आला होता. यात सीआरसी मॉकपोलनंतर बंद केलेली बटन सुरू करून अर्ध्या तासात ही मशीन सुरू करण्यात आली.
हेही वाचा - वाघाच्या भीतीमुळे 'या' गावात झाले नाही मतदान...