वर्धा- चरखा हा आर्थिक स्वावलंबनाचे प्रतीक. भारताच्या स्वातंत्र लढ्यातील हे महात्मा गांधींचे शस्त्र म्हणावे असेच. जेव्हपासून त्यांचा हातात चरखा आला तेव्हापासून चरख्याला वेगळी ओळख मिळाली. मात्र, या चरख्याला एक दोन शतक नव्हे तर पाच हजार वर्षे जुना इतिहास आहे. मोहेंजोदाडोच्या काळात तलम कापडाच्या दगडावरील काही पुराव्यातून चरख्याच्या उत्पत्तीचा इतिहास असल्याचा समजतो. हा इतिहास जाणून घ्यायाचा असेल तर चरखा घरातून जाणून घेता येणार आहे.
गांधी जयंती विशेष..! महात्मा गांधी अन् चरख्याचे नाते सांगणारा इतिहास
महात्मा गांधी व चरख्याचे नाते सर्वपरिचित आहे. मात्र, या चरख्या इतिहास तब्बल पाच हजार वर्षाचा आहे. गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला चरख्याच्या इतिहासावर 'ईटीव्ही भारत'ने टाकलेली प्रकाशझोत.
याच चरख्याचे अनेक पैलू सर जेजे स्कूलची प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी 7 दालन तयार करून मांडले आहे. येथे असणाऱ्या प्रोजेक्टरच्या माध्यमातून किमान दीड ते 2 मिनिटात चरख्याच्या निर्मितीपासून ते महात्मा गांधीजींच्या खादी, स्वराज, ग्रामोद्योग, अश्या विविध अंगांनी असले नाते आणि स्वतंत्र चळवळीतील महत्त्व मांडण्याचे काम खुबीने केले आहे. यात सात वेग वेगळे चरखे असून या चरख्यानी हातांनी फिरवले की सेन्सरच्या माध्यमातून चित्रफीत सुरू होईल आणि ही माहिती व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपात पाहायला मिळेल, अशी माहिती सर जेजे स्कूलचे प्राध्यापक विजय सकपाल आणि यशवंत भावसार यांनी दिली आहे.
यासह एक थ्री डायमेंशन फिल्म बनवण्यात आली आहे. ज्यात महात्मा गांधींचे जीवनपट 10 मिनिटांत मांडण्यात आहे. जुने व्हिडिओ, अॅनिमेशन, बॅकग्राऊंड संगीत, असा अभूतपूर्व अनुभव आणि तीन स्क्रिनसोबत वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मत, सर जेजे स्कूलचे विद्यार्थी पराग जाधव यांनी सांगितले.
चरखा हा पुरातन असला तरी याचा उल्लेखनीय काम महात्मा गांधींच्या जीवन कालखंडात झालेले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना चरख्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, अशा उद्देशाने काम सुरू केले. त्या काळात चरख्याच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा धडा देण्याचेही काम केले. 22 सप्टेंबर, 1925ला अखिल भारतीय संघाची स्थापना झाली. चरख्याच्या संशोधनासाठी 1923मध्ये महात्मा गांधींनी 5 हजार रुपयांचा पुरस्कारही घोषित केला होता. 1929मध्ये महात्मा गांधींच्या नियम व अटीनुसार चरखा बनवणाऱ्याला एक लाख रुपयांचा पुरस्कारही चरखा संघाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या अटी-शर्ती पूर्ण करणारा एकही चरखा बनला नाही.
याच चरख्यावर महात्मा गांधी यांनी आयुष्यभर आपले वस्त्र सूत कताई करून परिधान केले. यात विनोबा भावे यांनीही सूत कताई करून चरख्याचे अर्थकारण मांडले. त्या काळात गुंडीला 6 पैसे मिळत होते. यामुळे यात उदरनिर्वाह होऊ शकत नाही हे मांडण्यासाठी महिनाभर केलेल्या प्रयोगतून त्यांनी गुंडीला किमान 25 पैसे मिळावे ही व्यथा त्यांनी स्वतः विणकाराचे जीवन जगून मांडली. जसे शेती उत्पादनाचे साधन असू शकते तसेच चरखाही ग्रामीण उद्योगात महत्त्वाचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले.
चरख्यासोबत विदर्भातील वर्ध्याचे आणि चंद्रपूरचे नाते
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील सावली गावात येथे काही चरख्यांनी आकार घेतला. येथे बनलेले सुमारे 20 प्रकारचे चरखे आज मगन संग्रहालयात पाहायला मिळतात. यात मगनलाल गांधी निर्मित मगन चरखाही इथे आहे. दक्षिण भारतातील एकांबरनाथ यांनी 1949मध्ये भारतातील पाहिला अंबर चरखा निर्मित केला. 1970नंतरच्या काळात मगन संग्रहालयाचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत देवेंद्र गुप्ता यांनी तो वर्ध्यात आणला. आजही तो येथे आहे. येथे हाताने आणि पायाने चालनारे विविधापूर्ण चरखे आढळून येतात. मगनलाल गांधी हे महात्मा गांधी यांचे पुतणे होते. त्यांनी खादी आणि चरख्यावर संशोधन केले. यात त्यांची आठवण म्हणून गांधीजींनी वर्ध्याच्या संगर्हालयाला मगन संग्रहालय, हे नाव दिले.
यासोबत चरख्याचे काम करणाऱ्यांना रोजगार मिळवून देताना चरख्याचा एक नवयुग प्रारंभ झाले अनेक लोकांचे आयुष्य चरख्याप्रमाणे फिरू लागले विणकरांच्या समुदायालाही या चरख्यातून रोजगार मिळाला पुढील काळात आर्थिक बलशाली होण्यासाठी चरख्याची मोठी भूमिका राहिली.
हेही वाचा -हाथरस अत्याचार : वर्ध्यात सामाजिक संघटनांचे आंदोलन, पीडितेला न्याय देण्याची मागणी