गांधींच्या भूमीतील वृक्षतोड थांबवा, वर्ध्यात वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध - wardha tree cutting news
वर्धा शहरातील दत्तपूर ते आरती चौक सिव्हिल लाईन होत गांधी पुतळा ते सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गात जवळपास 160 वृक्ष ही ऐतिहासक स्थळाचा वारसा सांगणारी आहेत. हे वृक्ष तोडायला सुरवात झाल्याने नागरिक आणि गांधी प्रेमी प्रर्यावरणप्रेमींनी विरोध करायला सुरुवात केली.
वर्धा- शहरात सध्या महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहे. ही विकास कामे सुरू असताना जागतिक दर्जाच्या स्थळाला सोयी सुविधा देतांना रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. या माध्यमातून अनके वर्षांपासून असलेले रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी वृक्षतोड करणार आहे. अनेक वर्षांचा इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. यानिमित्ताने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
वर्धा शहरातील दत्तपूर ते आरती चौक सिव्हिल लाईन होत गांधी पुतळा ते सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गात जवळपास 160 वृक्ष आहेत. हे वृक्ष ऐतिहासक स्थळाचा वारसा सांगणारे, तसेच कैक वर्षांपासून रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ आणि सावली देत आहे. हे वृक्ष तोडायला सुरवात झाल्याने नागरिक आणि गांधी प्रेमी प्रर्यावरणप्रेमींनी विरोध करायला सुरुवात केली.
यासंदर्भात काल त्यांना निवेदन देण्यात आले. यासह बंधाकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली. विकासकामे होताना किती वृक्ष न कापता काम केले जाऊ शकेल यासाठी पाहणी करण्यात आली. यासंदर्भात पाहणी करून नियोजन केले जाईल, असे आश्वस्त करण्यात आले. यात पुढे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहेत.
वृक्षतोड म्हणजे जागतिक स्थळाच्या निकषांना तिलांजलीच....
सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटना प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे प्रशासनाद्वारे वृक्षतोड करून जागतिक वारसा स्थळासाठी आवश्यक निकषांनाच तिलांजली देत आहे. ''ज्या महात्मा गांधींनी अतिरेकी विकासाला नाकारत वृक्षांचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले, त्याच महात्म्याच्या १५० वा जयंती महोत्सव वृक्षांची कत्तल करून साजरा करण्यात येणार असेल तर ही अत्यंत खेदाची बाब आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण तो वृक्षतोड करून, पर्यावरणाला हानी पोचवून नका.' अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशन, तथा वन्यजीव मानद संजय इंगळे तिगावकार यांनी केली.
वृक्षतोड थांबवावी यासाठी नई तालिमच्या आनंद निकेतन विद्यालयाच्या प्राचार्य सुषमा शर्मा, अतुल शर्मा, शिक्षक अद्वैत देशपांडे, पर्यावरणप्रेमी संजय इंगळे तिगावकर, बहार नेचरफाउंडेशन, आम्ही वर्धेकर, वैदकीय जनजगृती मंचचे डॉ सचिन पावडे, ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे, यासह अनेक पर्यावरण प्रेमी संघटनानी वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली आहे.