महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 20, 2019, 10:12 PM IST

ETV Bharat / state

वर्ध्यात 1 हजार 314 मतदान केंद्रावर मतदान, प्रशासनातर्फे जय्यत तयारी

जिल्ह्यात आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा अशा ४ मतदारसंघात एकुण 47 उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या 11लाख 19 हजारांच्या जवळपास आहे. निवडणुकीकरता जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील 40 मतदार केंद्रावर गुलाबपुष्प व मिठाई देऊन दिवाळीच्या थीमवर मतदारांचे स्वागत करण्यात येणार आहे.

वर्ध्यात 1314 मतदान केंद्रावर मतदान

वर्धा - जिल्ह्यात आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा अशा ४ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात एकुण 47 उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या 11लाख 19 हजारांच्या जवळपास आहे. सोबतच मतदान केंद्रावर रांगोळी काढूनसुद्धा मतदानाचा संदेश दिला जात आहे. यात किती लोक घराबाहेर पडून मतदान करतात आणि कोणाला विजयाचा कौल देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

प्रशासनातर्फे जय्यत तयारी

४ मतदार संघामधून आर्वीत - 10, देवळी - 14, हिंगणघाट - 13, वर्ध्यात - 10 उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 11 लाख 49 हजार 758 मतदारांमध्ये, 5 लाख 88हजार 583 पुरुष मतदार तर, महिलांमधे 5लाख 61हजार 161 यासह इतर 14 मतदारांचा समावेश आहे. हे चारही मतदारसंघ मिळून जिल्ह्यात 1314 मतदान केंद्र आहेत. यासाठी वर्ध्यात सुरेश बगळे, देवळीत मनोज खैरनार, हिंगणघाटमध्ये चंद्रभान खंडाईत आणि आर्वीत हरीश धार्मिक हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे. सोमवारी सकाळी 7 वाजतापासून मतदानास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील 40 मतदार केंद्रावर गुलाबपुष्प व मिठाई देऊन दिवाळीच्या थीमवर मतदारांचे स्वागत करण्यात येणार आहे.

वर्ध्यात 1314 मतदान केंद्रावर मतदान

जिल्ह्यातील या ४ मतदारसंघात एकुण 1,314 मतदान केंद्र आहेत. यात आर्वीत -311, देवळी-330, हिंगणघाट-329 तर, वर्ध्यात-344 केंद्र आहेत. जिल्ह्यात 2 हजार 433 बॅलेट युनिट, 1 हजार 790 कंट्रोल युनिट व 1 हजार 918 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहेत.

हेही वाचा - वर्ध्यात बसमधून पिस्तुलसह दहा जिवंत काडतुस जप्त

सखी मतदान केंद्र

सर्व महिला कर्मचाऱ्यांकडून चालविण्यात येणाऱ्या सखी मतदान केंद्राची संख्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 आहे. याप्रमाणे चारही मतदारसंघात अशी 8 केंद्र असून ४ आदर्श मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यातील एकुण 132 मतदान केंद्रावर लाईव्ह स्वरुपात कॅमेरे लावण्यात आले आहे.

हेही वाचा - तुमच्या भाऊजींनी किती शेतकऱ्यांची जमीन लुटली हेही सांगा; स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात येत आहेत. यात महिला बचत गटाच्या महिला सदस्य मतदारांच्या स्वागतासाठी गणवेशात हजर असणार आहेत. यासोबत दिव्यांग मतदार, वृध्द नागरिक, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला इत्यादींचे स्वागत तर होणारच आहे पण सोबतच त्यांच्या मदतीला सहाय्यकही असणार आहेत. यावेळी दिव्यांग मतदान केंद्र ही संकल्पनासुध्दा ३ केंद्रावर राबविण्यात येणार आहे. तर जिल्ह्यातल चारही विधानसभा क्षेत्रात 139 मतदान केंद्राचे वेबकास्टींग करण्यात येणार आहे.

हेही वाचा - मंत्री पदाचा तोरा..! रावते म्हणतात मला ओळखत नाही का?

मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करणे व प्रोत्साहित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्या जात आहेत. मतदारांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा व उत्साहाने मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details