महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ८ जणांचा अहवाल निगेटिव्ह - वर्धा कोरोना

या कोरोना रुग्णाचे दुकान असल्याने त्या दुकानात येऊन गेलेले काही नागरिक बाधित आहे का? त्यांना काही लक्षणे आहे का? याबाबत माहीती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Wardha covid 19
वर्ध्यात आतापर्यंत १३ जणांना कोरोनाची बाधा

By

Published : Jun 10, 2020, 5:31 PM IST

वर्धा -शहराच्या रामनगर येथील रहिवासी असलेल्या ५९ वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉजिटीव्ह आला होता. दरम्यान, त्यांच्या संपर्कात घरातील ५ व्यक्ती आणि इतर ३ व्यक्ती होते. त्यांना खबरदारी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये ठेवत नमुने घेण्यात आले. आज हायरिस्क मधील ८ लोकांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला.

कोरोना रुग्ण आढळल्यानंतर रामनगर परिसरातील काही भाग कंटेंमेंट झोन घोषित झाला आहे. या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुुुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य विभागा अंतर्गत आशा वर्कर यांच्याकडून घरोघरी जाऊन माहिती घेत, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार केली जात आहे. यासह कोरोना रुग्णाचे दुकान असल्याने त्या दुकानात येऊन गेलेले काही नागरिक आहे का? त्यांना काही लक्षणे आहे का? याबाबतसुद्धा माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. तर २ रुग्णांवर इतर जिल्ह्यात उपचार करण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details