महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात मेणबत्ती लावून पार पडले मतदान; वादळी वाऱ्याचा फटका - due to power cut voting continue in candle light

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नगर पालिके समोरील विद्युत वितरण कार्यालयावरील झाडांच्या फांद्या विद्युत वितरण करणाऱ्या तारांवर पडल्याने शहरातील अनेक मतदान केंद्र यामुळे प्रभावित झाली. यामुळे काही मतदान केंद्रांवर मेणबत्ती लावून मतदान घेण्यात आले.

वर्ध्यात अंधारात मेणबत्ती लावून पार पडले 20 मिनिट मतदान

By

Published : Oct 21, 2019, 8:55 PM IST

वर्धा - हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात अचानक आलेल्या पावसामुळे वीज गेल्याने मेणबत्ती लावून मतदान पार पडले. यामुळे या ठिकाणी मतदानाचा टक्का थोड्या प्रमाणात प्रभावित होण्याची संभावना आहे.

वर्ध्यात अंधारात मेणबत्ती लावून पार पडले 20 मिनिट मतदान

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नगर पालिके समोरील विद्युत वितरण कार्यालयावरील झाडांच्या फांद्या विद्युतवाहक तारांवर पडल्याने शहरातील अनेक मतदान केंद्र यामुळे प्रभावित झाली. यामुळे काही मतदान केंद्रांवर मेणबत्ती लावून मतदान घेण्यात आले. याचा मतदारांना त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्याने प्रशासन सतर्क असतो. मात्र, हिंगणघाट विधानसभा मतदासंघातील हिंगणघाट शहरात विद्युत विभागाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे.

हेही वाचा -एक्झिट पोल : सेना-भाजपला स्पष्ट बहुमत.. महायुतीला १९० ते २३० जागांचा अंदाज, भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष

विद्युत विभागाचे सहायक अभियंता हेमराज पाटील हे आपल्या कर्तव्यावर उपस्थित नसल्याने विज वितरण विभागाकडून विज सुरू करण्यास जवळपास वीस मिनिटे लागली. याबाबत सहायक अभियंता हेमराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत भेटण्यासाठी टाळाटाळ केली. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मतदानावर प्रभाव पडला आहे. सहायक अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे आणि मुख्यालयात मतदानाच्या दिवशी गैरहजर राहिल्याने मतदारांची मोठी गैरसोय झाली. यामध्ये अनेक मतदान केंद्रावर अंधारात मेणबत्ती लाऊन मतदान घेण्यात आले.

हेही वाचा -दोन्ही हात नसतानाही पुण्यातील 'या' महिलेने केले मतदान

ABOUT THE AUTHOR

...view details