दारूच्या नशेत बापाचा मुलीवर चाकू हल्ला, स्वतः केली आत्महत्या
हिंगणघाट येथील धर्मेंद्र परसागडेला दारूचे व्यसन होते. यामुळे त्याचे कुटुंबात पत्नी मुलगा आणि 19 वर्षीय मुलगी तिघेही भाडेपट्टीवर गोमाजी वार्डात रहात होते. अधून-मधून त्यांच्याकडे जाऊन तो वाद घालत असे. दोन वर्षांपूर्वी अशाच झालेल्या वादात या सर्वांना त्यांने घराबाहेर काढल्याने ते दुसरीकडे भाड्याने राहत होते.
वर्धा - वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात विचित्र घटना उघडकीस आली. यात व्यसनाधीन बापाने दारूच्या नशेत पोटच्या मुलीवर चाकूहल्ला केला. या घटनेनंतर स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी आज मुलीची जबानी घेऊन तिच्या वडिलांच्या शोधात गेले असता त्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. हिंगणघाट पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करत नोंद घेतली. नीलिमा परसागडे असे जखमी मुलीचे तर, धर्मेंद्र असे मृत बापाचे नाव आहे.
हिंगणघाट येथील धर्मेंद्र परसागडेला दारूचे व्यसन होते. यामुळे त्याचे कुटुंबात पत्नी मुलगा आणि 19 वर्षीय मुलगी तिघेही भाडेपट्टीवर गोमाजी वार्डात रहात होते. अधून-मधून त्यांच्याकडे जाऊन तो वाद घालत असे. दोन वर्षांपूर्वी अशाच झालेल्या वादात या सर्वांना त्यांने घराबाहेर काढल्याने ते दुसरीकडे भाड्याने राहत होते. घटनेच्या दिवशी धर्मेंद्र हा मंगळवारी सायंकाळी दारू पिऊन आला पत्नी राहात असलेल्या घरी गेला. यावेळी मुलगी घरात झोपली होती.
हिंगणघाट शहरात गोमाजी वार्डात मासुरकर यांच्या घरी भाड्याने रहात असत. धर्मेंद्र दारूच्या नशेत या ठिकाणी गेला. यावेळी त्याची मुलगी नीलिमा ही गाढ झोपेत होती. त्याने तिला झोपेतून उठवत मारहाण केली. तिला थोबाडित मारली. यावेळी रागाच्या भरात खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर मारला. ती जखमी झाल्यानंतर तो पळून गेला. तिला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले.
यावेळी जखमी अवस्थेतून सावरल्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी तिचा जवाब नोंदवला. त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलीस तिच्या वडिलांच्या शोधात घरी गेले असता, धर्मेंद्र हा गळफास घेतल्याने मृतावस्थेत दिसून आला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत पाटणकर, परमेश्वर आगासे पोलीस कर्मचारी नरेंद्र कांबळे करीत आहे.