वर्धा - जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील धानोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या 31 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प यंदा पहिल्यांदा शंभर टक्के भरला असल्यामुळे प्रकल्पाचे पूर्ण ३१ दरवाजे 45 सेमीने उघडण्यात आले आहे. सध्या प्रकल्पातून 1323 क्युमेंकचा विसर्ग सुरु आहे. धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
निम्न वर्धा प्रकल्पाच्या 31 गेट मधून पाण्याचा विसर्ग हेही वाचा -अजित पवारांनी हरिभाऊ बागडेंना फोन केला अन् म्हणाले...
अमरावती जिल्ह्याच्या अप्पर वर्धा प्रकल्पातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. यामुळे शुक्रवार रात्री 12 वाजेपासून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. आज (शनिवारी) अप्परचे पाणी सोडल्याने निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी साठ्यात वाढ झाली. या वाढीमुळे निम्न वर्धाच्या बँक वाटरच्या पातळीत वाढ होऊन काही गावांना पुराचा फटका किंवा धोका निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा -'माझ्यावरील कारवाईमुळे अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा'
यासाठीच खबरदारी म्हणून 31 दरवाजे हे यामुळे पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाढ करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या प्रकल्पात 94 टक्के पाणी साठा आहे. तर दुपा नंतर पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.