महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गांधींच्या विज्ञानाला कसोटी होती अहिंसेची, मानव हिताची- डॉ अभय बंग - Gandhi Vigyan Sammelan

अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा विचार आणि कार्याचे सेवाग्राम हे कुरुक्षेत्र आहे. त्यामुळे हे संमेलन इथे होण्याला वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे, असे डॉ अभय बंग म्हणाले.

गांधींच्या विज्ञानाला कसोटी होती अहिंसेची, मानव हिताची- डॉ अभय बंग

By

Published : Mar 2, 2019, 1:25 PM IST

वर्धा -महात्मा गांधी विज्ञान विरोधी होते असा समज ज्यांना गांधी समजले नाही ते करून बसले बसले आहे. महात्मा गांधी हे विज्ञानाचा उपयोग ग्रामसेवेसाठी रचनात्मक कसे करत होते हे समजायला हवे गांधीजी नेहमी म्हणायचे माणूस हा विज्ञानाचा गुलाम नाही झाला पाहिजे. ते कधी विज्ञानाला डोक्यावर घेत नसत त्यांचे विज्ञान हे लोकोपयोगी होते. ज्ञानाचा उपयोग मानवी हितासाठी व्हायला पाहिजे त्यामुळे ते विज्ञानाला अहिंसेची कसोटी लावायचे. असे मत डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केले ते शांती भवन येथे आयोजीत तीन दिवसीय गांधी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटन सत्रा नंतर पत्रकरांशी बोलत होते.

पुढे बोलताना डॉ बंग म्हणाले, आज बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. आज देशात जातीवादी वातावरण पसरलेले असताना, यानिमित्ताने संमेलनातून गांधी आणि विज्ञानाचे काय नातं होतं हे समजून घेतले पाहिजे. गांधीवादी अंगाने विज्ञान कसे असेल याचा शोध या तीन दिवस संमेलनातून होईल. तसेच गैरसमज दूर होऊन गांधींचे विज्ञान सहयोगी असे स्वरूप स्पष्ट होईल अशी आशा आहे. मागच्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा विचार आणि कार्याचे सेवाग्राम हे कुरुक्षेत्र आहे. त्यामुळे हे संमेलन इथे होण्याला वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे, असे डॉ अभय बंग म्हणाले.

या संमेलनाला युवाकसह अनेक गांधीवादी विविध भागातून सहभागी झाले आहेत. या निमित्ताने इथे चित्र प्रदर्शनी,ग्रामोउपयोगी वस्तूचे प्रदर्शन असणार आहे. विविध गांधीवादी संस्थेच्या माध्यमातून तयार होणारे साहित्य इथे ठेवण्यात आले आहे. काही ग्रामोपयोगी प्रयोग इथे पाहायला मिळणार आहे. यावेळी या सत्राचे उद्घाटन म्हणून गांधी विचारवंत डॉ. अनिल सदगोपाल, स्वातंत्र्य संग्राम सैनिनी जी. जी. पारीख मुंबई, संमेलनाचे आयोजक विनय आर. आर हे विचारपीठावर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details