महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोनाच्या मृतदेहाला हात लावण्यास तयार', धोका नसल्याचा 'या' डॉक्टरचा दावा - कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाची विटंबना थांबवण्यासाठी डॉक्टरचा पुढाकार

कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाची विटंबना थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सेवाग्राम येथील डॉक्टरने पत्र लिहले आहे. यात दवाखान्यात निर्जंतुकीकरण एसोपी पाळून पॅक केलेला मृदेहापासून कुठलाच धोका नसल्याचे त्यांनी नमूद केले. यात मृतदेहाला हात लावण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Corona
डॉ. इंद्रजित खांडेकर

By

Published : Jun 29, 2020, 9:02 PM IST

Updated : Jun 29, 2020, 10:54 PM IST

वर्धा- सेवाग्राम येथील नामवंत डॉक्टरांनी कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाची विटंबना थांबवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यात दवाखान्यात निर्जंतुकीकरण एसोपी पाळून पॅक केलेला मृदेहापासून कुठलाच धोका नसल्याचे डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी नमूद केले आहे. यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनाही पत्र लिहले आहे. यात मृतदेहाला हात लावण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अद्याप दोन्ही कार्यलयातून कुठलेही उत्तर आले नसले, तरी हा दावा शासकीय गाईडलाईन्सच्या आधारावर केल्याचेही ते सांगतात.

'कोरोनाच्या मृतदेहाला हात लावण्यास तयार', धोका नसल्याचा 'या' डॉक्टरचा दावा

डॉ. इंद्रजित खांडेकर यांचा परिचय

डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी यापूर्वी वैद्यकीय अभ्यासक्रमात असलेली बलात्कार पीडितेची होणारी चाचणी अभ्यासक्रमातून काढण्यास पाऊले उचलली. त्यात त्यांना यश सुद्धा आले. न्यायालयात दिला जाणारा मृत्यूच्या कारणांचा अहवाल हा संगणकीय असावा, तो वाचला जाण्यास अडचण येऊ नये, यात न्यायलयाने आदेश दिलेत. विनाकारण होणारे शवविच्छेदन केले जाऊ नये, ही मागणी मान्य करत सेवाग्राम रुगणालायत अवलंब केला जात आहे. यासारख्या अनेक विषयांवर ते काम करतात. ते न्याय वैदकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

कोरोनामुळे एक वेगळा समज जन्माला आला आहे. कोरोनापूर्वीचा समज आणि कोरोनानंतरचा असा फरक दिसू लागला. पूर्वी एखाद्याचा मृत्यू झाला तरी चार लोक धावून जायचे. आता मात्र जीवंत माणसाच्या मदतीला जात नसल्याचे चित्र आहे. शिवाय मृत्यू झालेला मृतदेह असो की कोरोनाबाधित आजारामुळे मृत्यू झालेला असो कोणीही त्या मृतदेहाला हात लावण्यास तयार होत नाही. जवळचे कुटुंबीय सुद्धा त्या मृतदेहाला हात लावायला टाळतात. यामुळे ही भीती घालवणे गरजेचे आहे.

मृतदेह दवाखान्यातून देण्याची एसोपी आहे....

सध्याच्या परिस्थितीत मृतदेह कुटुंबीयांना सोपवताना त्याला एका बॉडी बॅग किंवा पॉलिथिन बॅगमध्ये दिला जाते. हा मृतदेह देण्यापूर्वी त्याला 1 टक्के हायप्रोक्लोराईड सोल्युशनने निर्जंतुक केले जाते. त्यानंतर त्याला व्यवस्थित पॅक करून मृतदेह दिला जातो. अशा पद्धतीने पॅक मृतदेहपासून कुठलाच धोका नाही हे सिद्ध आहे.

मृतदेह कुटुंबीयांकडून 'नेण्यास नकार', तर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून 'देण्यास नकार'....हे दुःखदच

मृतदेह हा कुटुंबीयांना दिला पाहिजे. त्यात त्या देहावर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार कुटुंबीयांना आहे. त्यात गैर नाही. पण कोरोनानंतर भयभीत वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जवळचे आप्तस्वकीय सुद्धा मृतदेह नेण्यास नकार देतात. तर कोरोना मुक्त झालेला रुग्ण असल्यास सुद्धा त्याला मूळ गावी नेऊ देण्यास नाकारले जात आहे. त्याचा अंत्यसंस्कार मृत्यू झालेल्या शहरात केला जात आहे. बरेचदा हात लावण्यास नकार दिल्याने मृतदेहाची विटंबना होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. शिवाय सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

अनाठायी भीती...अंत्यसंस्काराला 20 लोकच का?

कोरोनाने मृत्यू झाला असो वा इतर दुसऱ्या कारणाने झाला असो. यात अंत्यसंस्कार विधीसाठी केवळ 20 जणांना परवानगी देण्यात येत आहे. ही परवानगी मृदेहापासून भीती आहे म्हणून नाही, तर या ठिकाणी गर्दी होऊन या गर्दीतून बाधा होऊ नये यासाठी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेण्यासाठी कोरोनाच्या धर्तीवर नियमावली शासनाने घालून दिल्या आहेत. यामुळे मृतदेहापासून असलेली भीती अनाठायी असल्याचे मत डॉ खांडेकर सांगतात.

मी कोरोनाबाधित मृतदेहाला हात लावायला तयार - डॉ. खांडेकर

ही भीती आज मोठ्या प्रमाणात समाजात रुजली आहे. मृतदेह योग्य नियमावलीनुसार पॅक असल्यास मी मृतदेहाला हात लावण्यास तयार आहे. यामुळे मी हे केवळ बोलून नाही तर हे प्रात्यक्षिक करून दाखवण्याची तयारी आहे, असेही डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात नमूद केले आहे.

WHO गाईडलाईन काय सांगतात....

यात ही भीती केवळ सामान्य माणसात, समाजात नसून वैद्यकीय क्षेत्रात असल्याचे अनेक उदाहरणातून समोर आले आहे. मृतदेह WHO च्या गाईडलाईननुसार पॅक केला असेल, तर भीती नाही. पण खबरदारी म्हणून पीपीई घालून कर्मचारी स्मशानभूमीत दिसतात. यामुळे हा संदेश सर्वत्र जात असून यात गाईडलाईन किंवा शासकीय नियम पाळण्याऐवजी खबरदारी म्हणून भीती निर्माण झाली आहे.

वैद्यकीय भाषेत मृतदेहापासून धोका नाही याचा खुलासा

डॉ. खांडेकर सांगतात कुठलाही विषाणूचा संसर्ग होण्यासाठी जिवंत सेल्स शरीरात लागतात. ते मृत पावलेल्या शरीरात नसतात. यामुळे WHO च्या म्हणण्यानुसार अशा शरीरात किंवा मृतदेहापासून कोणाला लागण झाल्याचा पुरावा नसल्याचे डॉ. इंद्रजित खांडेकर सांगतात.

मृतदेह हा कुटुंबीयांना दिला पाहिजे...

कुटुंबीयांना हा मृतदेह न देणे एक खबरदारी असले, तरी तो द्यायला हरकत नाही. यात काळजी म्हणजे इतर घरगुती विधी केले जाऊ नये. लोकांनी पॅक असलेला मृतदेह चेहरा पहायचा आहे, म्हणून किंवा उघडून आलिंगन घालू नये, असे प्रकार टाळण्यासाठी हे खबरदारी म्हणून मृतदेह देणे टाळतात. मृतदेह दिल्यास हे प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला जवाबदारी म्हणून त्याच्या देखरेखीत अंत्यसंस्कार विधी पार पडावा असे सांगितले आहे.

कोरोनाच्या भीतीचे वातावरण घालवण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे

या कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे भीतीचे वातावरण घालवण्यासाठी मृतदेहापासून असलेली भीती घालवणे गरजेचे आहे. ही भीती निघाल्यास या कोरोनाच्या लढ्यात नकीच मदत होईल. यासह मृतदेहाची होत असलेली विटंबना थांबेल. या निमित्याने कोरोनामुळे संवेदना हरवत चाललो आहे का ? या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मिळेल अशी आशा करूयात असेही ते म्हणाले.

Last Updated : Jun 29, 2020, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details