पुणे-मुंबईतून गावाकडे परतलेल्या नागरिकांवर प्रशासनाची नजर, करणार . . . . - कोरोना
कोरोनामुळे पुण्या-मुंबईत असलेले नागरिक आणि विद्यार्थी गावाकडे परत येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावात परतलेल्या नागरिकांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार
वर्धा - कोरोनाचा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र यापूर्वी परदेशातून आलेल्या नागरिकांकडे लक्ष दिले जात होते. वाढती संख्या पाहता पुणे-मुंबई या शहरातून आलेल्या नागरिकांना तपासले जाणार आहे. त्यांची तपासणी करुन घरातच होम क्वॉरेटाईन करण्यात येणारआहे. वेगवेगळ्या मार्गाने आलेले साधारण हजार प्रवाशी अपेक्षित आहे. याची यादी नसल्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले.
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार