वर्धा - वर्ध्यातील जेनेटिक सायन्स कंपनीकडून 17 हजार रेमडेसिवीर औषधीच्या कुपींचा पहिला स्टॉक हा आभासी पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरिंच्या उपस्थितीत वितरकाला सोपविण्यात आला. हे इंजेक्शन नागपूरसह इतर ठिकाणी वितरित होणार आहे. यावेळी नितीन गडकरी यानी औषधीची पहिली खेप बाहेर पडल्याची माहिती फोनद्वारे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिली.
हेही वाचा -वर्ध्यात लसीकरण केंद्रांवर पाहाटेपासून रांग; जेष्ठ नागरिकांची फरफट
जेनेटिक कंपनीत 5 मे पासून रेमडेसिवीर औषध उत्पादनाला सुरवात झाली आहे. आतपर्यंत 1 लाख औषधीच्या कुपी तयार करण्यात आल्या आहेत. लवकरच याचे वाटप होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनीवरून वर्ध्यातील जेनेटिक लाइफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीर औषधीच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली. तसेच, महाराष्ट्रात योग्य नियोजन करून त्याचे वाटप करण्यासंदर्भात चर्चा केली.
गडकरी यांनी जेनेटिक कंपनीला दिली होती भेट