महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CORONA : वर्धा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - कोरोना विषाणू वर्धा

जगभरात फैलावणाऱ्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. पुणे आणि नागपूरमध्ये कोरोना विषाणू संसंर्गित रुग्ण आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

By

Published : Mar 14, 2020, 7:45 AM IST

Updated : Mar 14, 2020, 7:53 AM IST

वर्धा - कोरोना विषाणू महाराष्ट्राच्या उपराजधानीत दाखल झाल्याने खबरदारी पाहता आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्याने गरज भासल्यास खासगी रुग्णालय आणि यंत्रसामुग्री अधिग्रहित करता येते. या कायद्याने जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकारी यांना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी अधिकार बहाल केले आहेत.

वर्धा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुणे आणि नागपूरमध्ये कोरोना विषाणू संसंर्गित रुग्ण आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.

या कायद्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामु्ग्री अधिग्रहीत करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तसेच ज्यादा दराने मास्कची विक्री आणि औषधाची साठेबाजी करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करणे आणि सोशल मीडियावर कोरोना विषाणू संसर्गाबाबत अफवा पसरविणा-यांवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूचे रुग्ण पुणे, नागपूर, मुबंई आणि यवतमाळमध्ये देखील आढळून आले आहेत. मात्र, या विषाणूची उत्पत्ती भारतात नसल्यामुळे परदेशी गेलेल्या पर्यंटकाच्या माध्यमातून याचा फैलाव होत आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलीत करण्याचे काम केले जाणार आहे. परदेशी पर्यटक किंवा नागरिक हॉटेल किंवा नातेवाईकांकडे मुक्कामास आहेत, त्यांची माहिती संकलित करून जिल्हा रुग्णालयाला कळविण्याची जबाबदारी गृह विभागाला सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा -खळबळजनक ! 'कोरोना'च्या संशयातून दुबईतून परतलेल्या तरुणाला शेजाऱ्यांकडून मानसिक त्रास

कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, जिल्हास्तरावर नियंत्रण व मदत केंद्राची स्थापना करणे, वर्धा जिल्ह्यात परदेशातून आलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे, विलगीकरण व निरीक्षण कक्ष तयार करणे या जबाबदा-या आरोग्य विभागाकडे सोपविण्यात आल्या आहेत. याशिवाय औषधाची साठेबाजी आणि जास्त दराने मास्क विकणा-या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळा...

नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या संबंधात जिल्हाधिकारी यांनी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे. यामध्ये चित्रपटगृहे, यात्रा, पर्यंटन स्थळे, तिर्थक्षेत्र, सांस्कृतिक कार्यक्रम अशा गर्दी असणा-या कार्यक्रमामध्ये काही दिवस सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर गर्दी होणारे शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

कोरोनाच्या धर्तीवर जिल्हा प्रशासन तयार असल्याचे सांगितले जात आहे. यात नागिरकांनी अफवा पसरवू नये आणि अफवेला बळी न पडता काळजी घेण्याच आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी केले आहे.

Last Updated : Mar 14, 2020, 7:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details