महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'तोडपाणी' केली असती तर स्वतःची जमीन विकली नसती - धनंजय मुंडे - mundhe

शेतकऱ्यांचे उसाचे थकीत पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की घोटाळ्यात खाल्लेले पैसे दिले तर बरे होईल. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

By

Published : Apr 9, 2019, 11:22 AM IST

Updated : Apr 9, 2019, 11:52 AM IST

वर्धा- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला. विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर भाजप सरकारचे घोटाळे बाहेर काढू शकला नसता, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली होती, त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले.

धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारस मी कधीच स्वत:ला समजले नाही. वारसदाराचे काम पंकजाताईंनीच सांभाळावे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात तुम्ही सरकारमध्ये आहात, तेव्हा घोटाळ्यांची चौकशी समिती नेमावी, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचे उसाचे थकीत पैसे देण्यासाठी आईची जमीन गहाण ठेवण्यापेक्षा चिक्की घोटाळ्यात खाल्लेले पैसे दिले तर बरे होईल. बालपोषण आहाराच्या चिक्कीत २०० कोटी खाल्ले. तसेच ११० कोटींच्या फोनमध्ये ७० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला.

तुमच्या सरकारमधील १६ मंत्र्याचे घोटाळे बाहेर काढले. मी तोडपाणी करणारा असतो तर तुमचे घोटाळे बाहेर काढू शकलो नसतो. घोटाळे केले असते तर मला माझी जमीन राजकारण करण्यासाठी विकावी लागली नसती, असे मुंडे म्हणाले.

Last Updated : Apr 9, 2019, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details