वर्धा- पोळा सण शांततेत पार पाडण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिसांनी गव्हाकोल्ही येथील पारधी बेड्यावरील दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. यावेळी जमिनीत खड्डा करून मोठा सडवा तयार करण्यासाठी ठेवलेले दारूचे ड्रम नष्ट करण्यात आले. असा एकूण 1 लाख 34 हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे.
समुद्रपूर पोलिसांनी नष्ट केला दारू सडवा हेही वाचा - मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
समुद्रपूर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी गव्हाकोल्ही पारधी बेड्यावर छापा टाकत वा्ॅश आऊट मोहिम राबवली. या कारवाईने पोळ्याच्या सणावर अंकुश लावण्याचे काम करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिकारी हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे अरविंद येनूरकर, मनोहर मुडे, रवी पुरोहित, वैभव चरडे, नितेश मैदपवार, अमोल चौधरी आदींनी केली.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंसोबत १५ वर्षानंतर भेट झाली, आमदार भास्कर जाधव यांचा खुलासा