वर्धा -हिंगणघाट येथील रा. सु. बिडकर कॉलेजमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापकालाच लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेषराव जुडे असे या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उषाकिरण थुटे आणि प्राचार्य भास्कर आंबटकर तसेच लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त प्राध्यापकाला लाचेची मागणी, संस्था अध्यक्षासह प्राचार्य आणि लिपिकावर गुन्हा दाखल - रा. सु. बिडकर कॉलेज, वर्धा
रा. सु. बिडकर कॉलेजमध्ये डॉ शेषराव जुडे (६१) हे मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते नुकतेच ३१ जुलै २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे थकित वेतन व सेवानिवृत्तचे लाभ देय यासह वेतनासह सेवानिवृत्तिची पेंशन केस संस्थेने सहसंचालक यांच्याकडे पाठवने गरजेची होती. मात्र, काहीतरी आर्थिक लाभ मिळावा यासाठी त्यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली.
रा. सु. बिडकर कॉलेजमध्ये डॉ शेषराव जुडे (६१) हे मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते नुकतेच ३१ जुलै २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे थकित वेतन व सेवानिवृत्तचे लाभ देय यासह वेतनासह सेवानिवृत्तिची पेंशन केस संस्थेने सहसंचालक यांच्याकडे पाठवने गरजेची होती. मात्र, काहीतरी आर्थिक लाभ मिळावा यासाठी त्यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली. त्यांना ५५ हजार १५५ रुपये एवढ्या रकमेची मागणी केली. यात संस्था अध्यक्ष उषा किरण थुटे यांच्याशी झालेल्या संवादातून तडजोड करत 30 हजार देण्यास ठरले.
यादरम्यान जुडे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, 7 नोव्हेंबरला लाचलुचपत विभागाने महाविद्यालयाचे प्राचार्य आंबटकर यांच्या कार्यालयात धाड टाकून 30 हजार रकमेपैकी १० हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. संबंधित प्रकरणी लिपिक शेखर कुटे, प्राचार्य भास्कर आंबटकर, संस्थाध्यक्ष उषाकिरण थुटे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांनी ताब्यात घेतले.
संस्थाध्यक्ष थूटे या वर्धा जिल्हा परिषदच्या माजी सभापती आहेत. त्यामुळे या कारवाईने शहरात खळबळ माजली आहे.