महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा संचारबंदी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र न येण्याचे आदेश जिल्ह्याथिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच औषधे दुकाने वगळता सर्व बाजारपेठ आजपासून संध्याकाळी ७ पर्यंत, तर हॉटेल सायंकाळी 9 पर्यंत आणि लग्न व इतर कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींचे बंधन घालण्यात आले आहे.

wardha
वर्ध्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा संचारबंदी

By

Published : Feb 18, 2021, 9:10 AM IST

Updated : Feb 18, 2021, 9:16 AM IST

वर्धा - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या दर वाढीत राज्यात वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सायंकाळी 7 नंतर बाजार पेठ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आतापासून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वर्ध्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा संचारबंदी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी तसेच व्यावसायिक प्रतिष्ठाने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहे. यात रात्री हॉटेलला मात्र 9 पर्यंत वेळ देण्यात आली असून सामाजिकअंतर सामाजिक स्थळी मास्क हे बंधनकारक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कार्यक्रमासाठी आता फक्त 50 लोकांची परवानगी-प्रतिबंधक उपाययोजना म्हणून वर्धा जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागाकरीता जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यात पाच किवा त्यापेक्षा जास्त लोकांनी जमावाने एकत्र येऊ नये, धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका, यावर पुढील आदेशापर्यंत केवळ 50 व्यक्तींना परवानगी असणार आहे. लग्न समारंभात जास्त लोक असल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयेदेखील 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.पोलिसांची परवानगी घ्या, नियम तोडल्यास होणार कारवाई-

या आदेशान्वये कोणत्याही कार्यक्रमाकरिता संबधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. मिरवणूक आणि रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी म्हटले आहे.

लस आल्याचा बिनधास्त पण भोवणार, वेळीच काळजी घ्या

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिंकामध्ये निर्धास्तपणा दिसून येत आहे. यामुळे विना मास्क, सामाजिक अंतर यासारख्या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. पण पुढील धोका टाळण्यासाठी काळजी घेण्याची आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केली आहे.

Last Updated : Feb 18, 2021, 9:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details