वर्धा - देवळीच्या पुलगाव पोलीस ठाण्याअंतर्गत आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. यात विजयगोपालच्या घटनेत एका युवकाने, तर गुंजखेडा परिसरात प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. रवी नानाजी कात्रे (वय 23) असे युवकाचे तर वृषाली मारोती मुसळे (वय 19) असे मृत तरुणीचे नाव आहे. तसेच विजयगोपाल येथील घटनेतील मृत युवकाचे संदीप सदाशिवराव चिखलकर(वय 30) असे नाव आहे.
हे प्रेमीयुगुल गुंजखेडा येथील रहिवासी असून मंगळवारपासून दोघेही बेपत्ता होते. शुक्रवारी संध्याकाळी परिसरातील एकनाथ ब्राह्मणकर यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह दिसल्याने खळबळ माजली. या दोघांचे मागील अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण असल्याची गावात चर्चा आहे. या दोघांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली, हे अद्याप अस्पष्ट आहे.
गुंजखेड्यात प्रेमीयुगलाची, तर विजयगोपालमध्ये तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - wardha crime
देवळीच्या पुलगाव पोलीस ठाण्याअंतर्गत आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. यात विजयगोपालच्या घटनेत एका युवकाने तर गुंजखेडा परिसरात प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. गावात बातमी पसरताच परिसरातील स्थानिकांनी देखील घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
विजयगोपाल येथील संदीप सदाशिवराव चिखलकर हा महालक्ष्मी पेट्रोलपंपवर काम करत होता. त्याला 15 दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले. कामावरील पैसे मिळण्याच्या वादावरून पंपावरील एका कर्मचाऱ्यांसोबत वाद झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तो गुरुवारी पेट्रोलपंपवर जातो म्हणून घराबाहेर गेला. पण घरी परतालाच नाही. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर वीरेंद्र झोरे यांच्या शेतात मृतदेह आढळला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिट्ठी लिहून ठेवली असून ती विहरीजवळ सापडल्याची माहिती पोलीस पाटील गौरव वाकोडे यांनी दिली आहे.
पेट्रोलपंपावर कार्यरत मॅनेजर संदीपला त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. पुलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.