वर्धा-सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे तिथेच अडकून पडले आहेत. वर्ध्याच्या सेलू (काटे) येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे इयत्ता नववीचे विद्यार्थी सोनीपतच्या जवाहर नवोदय विद्यालयात आहे. अभ्यासक्रमानुसार स्थलांतरित केलेले हे सगळे विद्यार्थी सुखरूप, सुरक्षित आहेत. त्यामुळे पालकांनी काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे प्राचार्य एस. जी. गवई यांनी कळवले आहे. अशापद्धतीने अनेक विद्यालयांचे विद्यार्थी अडकून पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले जात आहे.
वर्ध्याच्या सेलू (काटे) येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या नववीच्या 21 विद्यार्थ्यांना 'मायग्रेशन'अंतर्गत सोनीपतच्याच्या नवोदय विद्यालयात पाठवण्यात आले होते. यामध्ये दोन्ही शाळेच्या मुलांना एक्स्चेंज पद्धतीने पाठवले जाते. यामध्ये सोनीपतचे विद्यार्थी इथे आले होते. मात्र, त्यांना 'मायग्रेशन' संपत आल्याने परत पाठवण्यात आले. पण, वर्ध्याचे विद्यार्थी येण्याच्या दिवशीच लॉकडाऊन जाहीर झाले. यामुळे आणि विद्यार्थ्यांना सोनीपतहून पाठवता आले नाही.